-
गेले काही दिवस बॉलिवूड अभिनेत्री क्रीती सनॉन चांगलीच चर्चेत आहे.
-
वरुण धवनबरोबरच्या ‘भेडिया’ चित्रपटाच्यानिमित्ताने तिची चर्चा आहे, शिवाय सलग काही चित्रपट सुपरहीट दिल्याने ती बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत अभिनेत्री बनली आहे.
-
यादरम्यानच तिच्या खासगी आयुष्याबद्दलही बरंच बोललं जात आहे.
-
क्रीती सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासला डेट करत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
-
क्रीती लवकरच प्रभासबरोबर ‘आदिपुरुष’ या चित्रपटात दिसणार आहे.
-
या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे आणि नुकतंच या चित्रपटाच्या टीझरमुळे चांगलंच वादळ निर्माण झालं होतं.
-
सध्या प्रभास दीपिका पदूकोणबरोबर परदेशात चित्रीकरणात व्यस्त आहे.
-
नुकतंच एका मुलाखतीदरम्यान वरुण धवनने क्रीती प्रभासला डेट करत असल्याची हिंट दिली आहे.
-
याआधीही क्रीतीचं नाव इतर अभिनेत्यांशी जोडलं गेलं होतं.
-
अभिनेता कार्तिक आर्यन आणि क्रीतीचे बाहेर फिरतानाचे फोटो बरेच व्हायरल झाले होते.
-
या फोटोवरुन तिच्यात आणि कार्तिक आर्यनमध्ये काहीतरी असल्याची चर्चा रंगली होती.
-
शिवाय दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुतबरोबरही ती रिलेशनशिपमध्ये होती अशी चर्चा होती.प्रभास किंवा क्रीतीने काहीही स्पष्टीकरण दिलं नसलं तरी दिवागणिक त्यांच्यातील नात्याच्या चर्चेला उधाण येत आहे. येत्या काही दिवसात ते दोघे याबद्दल अधिकृत घोषणादेखील करतील असंही काही लोकांचं म्हणणं आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”