-
अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान ही सध्या चर्चेत आहे.
-
काही दिवसांपूर्वी आमिर खानच्या लेकीने गुपचूप साखरपुडा उरकला.
-
तिने तिचा बॉयफ्रेंड आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेबरोबर साखरपुडा केला आहे.
-
या दोघांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
-
आता आयराने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
-
आयराने तिच्या साखरपुड्यासाठी लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता.
-
तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती होणारा नवरा नुपूर शिखरेची आई प्रीतम यांच्याबरोबर डान्स करताना दिसत आहे.
-
आयराच्या सासूबाईंनी अगदी पारंपरिक मराठमोळा लूकमध्ये साखरपुड्याला हजेरी लावली होती.
-
साडी परिधान करत त्या आपल्या होणाऱ्या सूनेबरोबर बेभान होऊन नाचताना दिसल्या.
-
शिवाय आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावही आयराच्या सासूबाईंबरोबर मनसोक्त नाचली.
-
“आमच्या साखरपुड्यातील सर्वात मजेशीर व आनंदी व्यक्तीला तुम्ही पाहिलंत का? मला तुमच्यासारखं मनसोक्त जगायचं आहे.” असं आयराने तिच्या सासूबाईंचे फोटो शेअर करताना म्हटलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

Tanisha Bhise Death Case : “होय डॉक्टरांनी डिपॉझिट मागितले होते”, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाची कबुली; म्हणाले, “त्या दिवशी…”