-
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
-
बॉक्स ऑफिसवर २०२२ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा उल्लेख आवर्जुन केला जातो. या चित्रपटाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले.
-
हा चित्रपट १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. मात्र आता हा चित्रपट एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे.
-
इफ्फीचे ज्युरी हेड नदाव लॅपिड यांनी केलेल्या विधानामुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे.
-
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) या चित्रपटाचे ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचा वाद निर्माण झाला आहे.
-
गोव्यात आयोजित ५३ व्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलताना नदाव लॅपिड यांनी हा चित्रपट ‘वल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ असल्याचं जाहीरपणे सांगितलं. त्यानंतर वादाला तोंड फुटले.
-
यानंतर नदाव लॅपिड नक्की कोण असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.
-
नदाव लॅपिड यांचा जन्म १९७५ रोजी इस्राईलच्या तेल अवीव या ठिकाणी झाला.
-
नदाव लॅपिड हे पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी तेल अवीव विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची पदवी घेतली.
-
नदाव लॅपिड यांनी काही काळ लष्करामध्ये देखील काम केले आहे.
-
त्यानंतर जेरुसलेममधील सॅम स्पीगल फिल्म अँड टेलिव्हिजन स्कूलमध्ये पदवी घेण्यासाठी ते इस्राइलला परतले. त्यांना ‘सिनोनिम्स’ (२०१९) या चित्रपटामुळे ओळखले जाते.
-
त्याशिवाय त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द किंडरगार्टन टीचर’ (२०१९), ‘पोलिसमॅन’ (२०११) या चित्रपटांना विशेष लोकप्रियता मिळाली होती.
-
या दोन्हीही चित्रपटांसाठी त्यांना गोल्डन बेअर आणि कान्स ज्युरी पारितोषिकही मिळाले. २००५ मधील रोड या शॉर्ट फिल्मची निर्मिती देखील त्यांनी केली.
-
यापूर्वी लॅपिड हे २०१५ मध्ये झालेल्या लॉरकॅनो फिल्म फेस्टिव्हलमध्ये गोल्डन लेपर्ड ज्युरी मेंबर होते.
-
तसेच २०१६ मधील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही त्यांनी आंतरराष्ट्रीय ज्युरी म्हणून काम पाहिले.
-
तर २०२१ मध्ये झालेल्या ७१ व्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल महोत्सवातही त्यांनी ऑफिशियल कॉम्पिटिशन ज्युरीची भूमिका पार पाडली होती.
-
तर २०२१ मध्ये झालेल्या ७१ व्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल महोत्सवातही त्यांनी ऑफिशियल कॉम्पिटिशन ज्युरीची भूमिका पार पाडली होती.
-
नदाव लॅपिड हे ४७ वर्षांचे आहेत. मात्र कायमच ते त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.
गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’