-
सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘रोबोट २.०’ या चित्रपटाला आज ४ वर्षं पूर्ण झाली असून हा आजवरचा तामीळ चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.
-
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेकिंग ६०० कोटी इतकी कमाई केली होती.
-
सुपरस्टार रजनीकांत यामध्ये त्यांच्या आयकॉनिक ‘चिट्टी’च्या भूमिकेत दिसले. याचं दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक शंकर यांनी केलं. यामध्ये मुख्य खलनायकाची भूमिका खिलाडी कुमार अक्षय कुमारने निभावली.
-
यातील अक्षय कुमारचं पात्र ‘पक्षीराजन’ हे या चित्रपटाचं मुख्य आकर्षण होतं. या चित्रपटात वापरलेले व्हीएफएक्स हे खूप उत्कृष्ट होते आणि त्याच सहाय्याने अक्षयचा हा लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.
-
अक्षय कुमारच्या लूकवर प्रचंड मेहनत घेतली गेली.
-
अक्षयला या भूमिकेसाठी बराच मेकअप करावा लागत असे आणि त्यासाठी त्याला बराच वेळही लागत असे.
-
अक्षयची भूमिका ही खलनायकाची असली तरी या चित्रपटातील खलनायकाचा उद्देश हा चांगला दाखवला आहे.
-
अक्षयने साकारलेल्या या भूमिकेची खूप प्रशंसा झाली. प्रेक्षक तसेच समीक्षक यांनाही अक्षयची ही भूमिका वेगळी वाटली आणि पसंत पडली.
-
खुद्द रजनीकांत यांनीसुद्धा अक्षय कुमारच्या मेहनतीचं कौतूक केलं होतं.
-
एका मुलाखतीदरम्यान रजनीकांत यांनी अक्षयच्या भूमिकेमागच्या मेहनतीबद्दल खुलासा केला होता.
-
‘झी तामीळ’शी संवाद साधताना तेव्हा रजनीकांत म्हणाले होते, “अक्षय कुमारच्या मेहनतीला मी सलाम करतो. दिल्लीच्या कडक उन्हाळ्यातसुद्धा एवढा सगळा मेकअप अंगावर घेऊन तितकंच मन लावून काम करणं हे खरंच खूप कठीण आहे. या चित्रपटाचा खरा हीरो अक्षयच आहे.”
-
अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्या जबरदस्त परफॉर्मन्समुळेच हा चित्रपट सुपरहीट ठरला. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य