-
The Kashmir Files: गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये इस्त्रायलचे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते लॅपिड यांनी द काश्मीर फाईल्स विषयी वादग्रस्त विधान केले होते.
-
द काश्मीर फाईल्स चित्रपट आपल्याला व्हलगर (अश्लील) तसेच प्रपोगंडा (विशिष्ट उद्देशाने प्रचार करण्याच्या हेतूने बनवलेला) वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. असे लॅपिड यांनी म्हंटले होते.
-
‘द काश्मीर फाइल्स’ ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. केवळ २५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटींहून अधिक कमाई केली.
-
द काश्मीर फाइल्स’मध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते
-
इंडिया टुडेच्या अहवालानुसार या चित्रपटातील भूमिकेसाठी अनुपम खैर यांना १ कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते
-
मिथुन चक्रवर्ती यांनी या चित्रपटासाठी १.५ कोटी रूपये मानधन घेतले होते.
-
द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना या चित्रपटासाठी १ कोटी रुपये मिळाले होते.
-
विवेक अग्निहोत्री यांची पत्नी व अभिनेत्री पल्लवी जोशी यांना सिनेमासाठी ५० ते ७० लाख मानधन मिळाले होते
-
मृणाल कुलकर्णी यांना द काश्मीर फाईल्ससाठी जवळपास ५० लाख रुपये मानधन मिळाले होते.
-
पुनीत इस्सर यांना ५० लाख व दर्शन कुमार याला ४५ लाख रुपये मानधन मिळाले होते.
-
केवळ इस्रायलच्या दिग्दर्शकाने नव्हे तर भारतात व महाराष्ट्रातही विरोधी पक्षाने हा चित्रपट प्रपोगंडा असल्याचे सांगितले होते.
-
द काश्मीर फाईल्सला भारतातच नव्हे तर परदेशातही भरघोस प्रतिसाद मिळाला होता. जगभरात या चित्रपटाने ३४०.४२ कोटीची कमाई केली होती.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”