-
‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद ही नेहमी तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते.
-
तिचे फॅशन सेन्स आणि तिचे ड्रेस नेहमीच चर्चेत असतात.
-
उर्फी ही सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहतो.
-
उर्फीने तिच्या बोल्ड अंदाजासोबतच तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
-
कधी ब्रॉ फ्लॉन्ट केल्याने तर कधी पॅन्टचं बटन न लावल्याने उर्फी जावेद चर्चेत असते.
-
तिच्या या हटके फॅशनमुळे नेटकऱ्यांकडून तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. पण त्याकडे ती दुर्लक्ष करते.
-
इतके बोल्ड आणि हटके कपडे घालणारी उर्फी नेमकं काय काम करते? ती महिन्याला साधारण किती पैसे कमवते? असे प्रश्न अनेकांना पडलेले असतात.
-
मात्र नुकतंच याचं उत्तर समोर आलं आहे.
-
उर्फी जावेदचा जन्म १९९६ मध्ये लखनऊमध्ये झाला. ती महिन्याला भरपूर पैसे कमवते.
-
सध्या ती मुंबईत राहत आहे. मुंबईत तिने स्वत: अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.
-
उर्फी याआधी अनेक छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात झळकली आहे.
-
तिने ‘दुर्गा’, ‘सात फेरे की हेरा फेरी’, ‘बेपन्ना’, ‘जीजी माँ’, ‘डायन’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ यासारख्या अनेक मालिकेत काम केले आहे.
-
उर्फी जावेद ही बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती. बिग बॉस ओटीटी या कार्यक्रमानंतरच ती प्रसिद्धीझोतात आली.
-
उर्फी जावेद ही कार्यक्रमाच्या प्रति एपिसोडसाठी साधारण ३०००० ते ४०००० मानधन आकारते.
-
त्याबरोबरच ती जाहिरातीच्या माध्यमातूनही लाखो रुपये कमवते.
-
इतकंच नव्हे तर उर्फीचे इन्स्टाग्रामवर ३० लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही ती लाखो रुपयांची कमाई करते.
-
काही मीडिया रिपोर्टसनुसार, उर्फी ही दर महिन्याला साधारण दीड कोटींची कमाई करते.
-
त्यामुळेच सर्वाधिक कमाई करणार्या टीव्ही कलाकारांच्या यादीत तिचा समावेश असतो.

Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर, पंतप्रधानांची मतदानाला दांडी