-
मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बी-टाउनमधील सर्वाधिक चर्चेत असणारं जोडपं. दोघे अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांचे चाहतेदेखील त्यांच्या लग्नाची वाट बघत आहेत. मात्र अशातच मलायका गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले.
-
४९व्या वर्षी मलायका अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असल्याची बातमी ‘पिंकविला’ने दिली होती. त्यानंतर मलायका अरोरा व अर्जुन कपूर गूड न्यूज देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर अर्जुन कपूर आणि खुद्द मलायका अरोरानेच या चर्चांवर संताप व्यक्त केला आहे.
-
“अत्यंत खालच्या थराला जाऊन अगदी सहजरित्या तुम्ही ही बातमी दिली. यातून असंवेदनशील व अनैतिकपणा दिसतो. रोज अशा बातम्या तुम्ही देत आहात, ज्याकडे आम्ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. पण हे बरोबर नाही. आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका”, असं अर्जुनने आपल्या स्टोरीमध्ये लिहीलं होतं.
-
मलायकाने अर्जुन कपूरची ही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत खोटी बातमी देणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. “हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे” असं तिने म्हटलं आहे.
-
मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असून ही गूड न्यूज त्यांनी नातेवाईकांना दिली असल्याची बातमी पिंकविलाने दिली होती. दरम्यान, अर्जुनचा राग अजूनही शांत झाल्याचे दिसत नाही.
-
त्याने आणखी एक स्टोरी शेअर करत म्हटलंय, ‘प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ मिळते. तुम्ही आयुष्यभर लोकांशी पंगा घेऊ शकत नाही. तुम्ही कोण आहात याची मला पर्वा नाही. जशी करणी तशी भरणी. लगेचच किंवा नंतर, तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ नक्की मिळेल.’
-
दरम्यान, अर्जुनने मलायकाचा बचाव करत ट्रोलर्सना खडे बोल सुनावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही या दोघांच्या नात्याबाबत अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या.
-
काही दिवसांपूर्वी, मलायका आणि अर्जुन लवकरच वेगळे होणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यावेळीही अर्जुनने मोजक्या शब्दातच पत्रकारांचा समाचार घेतला होता.
-
अर्जुनने मलायका आणि त्याचा मिरर सेल्फी पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहले, “येथे वायफळ अफवांना जागा नाही. सुरक्षित राहा. सुखी राहा. लोकांना शुभेच्छा. सर्वांना प्रेम.”
-
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी त्यांचे नाते बराच काळ लपवून ठेवले होते. अखेर आता त्यांनी त्यांचे नाते सर्वांसमोर उघडपणे कबुल केले आहे. या जोडप्याने अनेकदा ‘लग्नाबाबत काहीही विचार नसल्याचे’ स्पष्ट केलेले असतानाही, गेल्याच आठवड्यात त्यांच्या लग्नाच्या अफवा पसरू लागल्या.
-
या अफवांवर अर्जुनने एक मजेदार पोस्ट लिहून प्रतिक्रिया दिली. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, ‘माझ्यापेक्षा इतरांनाच माझ्या आयुष्याबद्दल अधिक माहिती आहे असे वाटते.’
-
अर्जुनने, त्याच्या आणि मलायकाच्या संपत्तीची तुलना करणाऱ्या एका रिपोर्टला धारेवर धरले होते. याबद्दल त्याने अत्यंत कठोर शब्दात पोस्ट लिहिली होती. काही काळाने अर्जुनने ही पोस्ट हटवली असली तरीही तिचे स्क्रीनशॉट्स मात्र वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले होते.
-
त्याने लिहिले होते, “२०२१ मध्ये अशाप्रकारची हेडलाइन वाचणे अत्यंत दुःखद आणि खेदजनक आहे. अर्थातच ती चांगली कमाई करते आणि इतर कुणाशीही तुलना होणार नाही अशा पदावर पोहोचण्यासाठीच ती इतकी वर्ष काम करत आहे.”
-
जेव्हापासून अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबतचे नाते अधिकृत केले आहे, तेव्हापासून या जोडप्यावर त्यांच्या वयातील अंतराबाबतच्या प्रश्नांचा भडीमार सुरू आहे. वयाच्या आधारावर नात्याला अधोरेखित करणे हा एक मूर्खपणा असल्याचेही अर्जुन म्हणाला आहे.
-
अर्जुन म्हणतो की, ‘ही माध्यमेच आमच्या पोस्टवरील सर्व कमेंट्सचा विचार करतात.’ तो पुढे म्हणाला की ‘सेलेब्स ९० टक्के कमेंट्स पाहतही नाहीत. म्हणूनच ट्रोलिंगला इतके महत्त्व दिले जाऊ नये. कारण ते सर्व खोटं असतं. हेच लोक आम्हाला भेटल्यावर आमच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी धावाधाव करत असतात.’

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य