-
दाक्षिणात्य स्टार विजय देवरकोंडा आज अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. आज देशभरात त्याचे चाहते आहेत.
-
नुकताच त्यांचा ‘लायगर’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट फारसा चालला नाही. मात्र या चित्रपटामुळे तो सध्या अडचणीत आला आहे.
-
काल केंद्रीय तपासयंत्रणा ईडीने त्याची चौकशी केली. ईडीला या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये गैरमार्गाने पैसे वापरल्याचा संशय आहे.
-
‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
-
विजय एका चित्रपटासाठी तब्बल १२ कोटी रुपये मानधन घेतो. लायगर चित्रपटासाठी त्याने तब्बल ३५ कोटी रुपये घेतले आहेत असं बोलले जात आहे.
-
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्याची एकूण संपत्ती २०२२ पर्यंत $७ दशलक्ष असण्याचा अंदाज आहे , म्हणजे भारतीय रुपयात ५५ कोटी इतकी आहे.
-
विजय देवरकोंडा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला आघाडीचा अभिनेता आहे. सर्वात महागडा अभिनेता म्हणून तो ओळखला जातो.
-
CERA India, Breezer Vivid Shuffle, Thumps Up, Myntra यासांरख्या कंपन्यांच्या जाहिराती विजय करतो.
-
याशिवाय विजयाकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. मर्सिडीज बेंझ, फोर्ड मस्टँग , लँड रोव्हर रेंज रोव्हर, BMW 5, Volvo यासारख्या महागड्या गाड्या त्याच्याकडे आहेत. प्रत्येक गाडीची किंमत ५० लाखांपासून ते ४ कोटींपर्यंत आहे.
-
हैदराबाद येथे त्याचा १५ कोटींचा बंगला असून तो आपल्या कुटुंबाबरोबर तिकडे राहतो. आलिशान घरामध्ये ट्रेंडिंग डेकोर स्टाईल, आंतरराष्ट्रीय वास्तुविशारदांनी डिझाइन केलेले भव्य इंटीरियर, बाल्कनी लॉन, एक अतिशय सुसज्ज जिम, एक मिनी थिएटर, सिटिंग प्लाझा आणि इतर अनेक सुविधांचा समावेश आहे.
-
विजय देवरकोंडा, अभिनेत्री रश्मिका मंदाना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. डिअर कॉम्रेड व गीता गोविंदम चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं होतं.
-
विजय सध्या त्याच्या आगामी ख़ुशी चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर समंथादेखील असणार आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”