-
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे नावारुपाला आलेली जोडी म्हणजे अक्षय देवधर व हार्दिक जोशी.
-
त्यांनी या मालिकेमध्ये साकारलेलं राणादा आणि पाठकबाई हे पात्र तर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आलं आहे.
-
शुक्रवारी (२ डिसेंबरला) या दोघांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
-
सध्या दोघांच्याही घरी लगीनघाई सुरु आहे. यादरम्यानचे दोघांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
पण या दोघांची भेट कशी झाली? त्यांची प्रेमकथा कशी फुलत गेली? याविषयी हार्दिकने झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ कार्यक्रमामध्ये भाष्य केलं होतं.
-
या कार्यक्रमाचा सुत्रसंचालक सुबोध भावेने हार्दिकला त्याच्या व अक्षयाच्या प्रेमकथेबाबत विचारलं होतं.
-
यावेळी हार्दिक म्हणाला, “‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे आम्ही पाच वर्ष एकत्र होतो. आमचं एक कुटुंबच होतं. मालिकेदरम्यान आमची मैत्री झाली. लग्नाचा विचार काही माझ्या डोक्यात नव्हता. मला तू आवडतेस तर तुला काय वाटतं? असं माझी आई सारखी तिला (अक्षया देवधर) विचारायची.”
-
“पण हे मला नंतर कळालं. नंतर असं झालं की मालिका संपली आहे. नंतर दुसरी कोणती मालिका तू करशील. सध्या घरातच आहेस तर लग्नाचा विचार कर. वय निघून जात आहे असं सतत मला आई म्हणायची.”
-
“त्यानंतर एकदा आई मला म्हणाली, अक्षयाशी तू लग्नासाठी बोलून बघ. माझं एकदा तिला विचारुन झालं आहे. तेव्हा मी आईला म्हटलं, मी असं केलं तर ती कुठे माझ्याशी थोडं बोलते तेही बंद करेल. पण माझ्यासाठी एकदा तिला विचार असं आई मला म्हणाली. मी माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी आईसाठी करतो. म्हणून एकदा अक्षयाला लग्नासाठी विचारण्याचा मी निर्णय घेतला.”
-
“अक्षयाला मी बोललो, आपण दोघंही एकमेकांना ओळखतो. आपल्या दोघांच लग्न व्हावं अशी माझ्या आईची इच्छा आहे. यावर अक्षया म्हणाली, ठिक आहे एकदा तू माझ्या घरी येऊन बोल. कारण मीही असा काही लग्नाचा विचार केलेला नाही.”
-
“त्यानंतर मी अक्षयाच्या घरी गेलो. तिच्या आई-वडिलांनी यावर आम्ही विचार करतो असं सांगितलं. त्यानंतर थेट सहा महिन्यांनंतर लग्नाच्या तारखाच आल्या. माझी नवी मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेचं चित्रीकरण सुरु होतं.”
-
“यादरम्यान मला आईचा फोन आला. मला म्हणाली फोनमध्ये फोटो पाहिलास का? मी नाही म्हणून उत्तर दिलं. ती म्हणाली फोन ठेव आणि फोटो बघ. त्या फोटोमध्ये सगळ्या तारखाच होत्या. एप्रिलच्या २० तारखेला मला सगळं सांगितलं आणि म्हणाली पुढच्या दहा दिवसांमध्ये तुला साखरपुडा करायचा आहे.”
-
“त्यात आईची इच्छा होती की ३ मेला तिच्या वाढदिवसादिवशी साखरपुडा झाला पाहिजे. म्हणून अक्षय्य तृतीयेला मी व अक्षयाने साखरपुडा केला.”
-
“पण जर आई बोलली नसती तर मी कधीच अक्षयाला विचारलं नसतं. एवढी हिंमत माझ्यामध्ये नाही. याबाबतीत मी राणादा सारखा आहे.” (सर्व फोटो – इन्स्टाग्राम )
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच