-
अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर आज (२ डिसेंबर २०२२) विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ते दोघेही घराघरात पोहोचले. या मालिकेत हार्दिक जोशीने राणादा ही भूमिका साकारली होती.
-
तर अक्षया देवधर ही या मालिकेत पाठकबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळाली.
-
राणादा आणि पाठकबाई ही जोडी छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरली होती.
-
रिल लाईफमधली ही जोडी आता रिअल लाईफमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे.
-
राणादा आणि पाठकबाई यांनी अक्षय्य तृतीया दिवशी साखरपुडा करत चाहत्यांना धक्का दिला होता.
-
त्यानंतर हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या दोघांच्या घरी लगीनघाई सुरु असल्याचे फोटोही समोर आले होते.
-
छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने खऱ्या आयुष्यातही एकत्र येण्याचा निर्णय घेत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.
-
काही दिवसांपूर्वी अक्षयाचा मेहंदी सोहळा रंगला होता. तिने हाता-पायावर अगदी सुरेख मेहंदी काढली होती.
-
अक्षया आणि हार्दिक यांच्या हळदी सभारंभाचेही फोटोही त्यांनी शेअर केले होते.
-
अक्षया आणि हार्दिक यांच्या हळदी सभारंभाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
यावेळी तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अनेक कलाकारांनी धमाल केल्याचे पाहायला मिळाले.
-
अक्षया हार्दिकच्या लग्नसोहळ्याची चाहते मोठ्या उत्साहाने वाट पाहताना दिसत आहेत.
-
त्यानंतर काल त्यांचा संगीत सोहळा पार पडला. यात त्यांनी छान वेस्टर्न कपडे परिधान केले होते.
-
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आज पुण्यात विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
‘आली लग्नघटिका समीप..” अक्षया देवधर-हार्दिक जोशीच्या लग्नातील पहिला फोटो समोर
-
यात ते दोघेही फारच सुंदर दिसत आहे. (सर्व फोटो – अक्षया देवधर/हार्दिक जोशी, इन्स्टाग्राम)
-
आणखी वाचा : “आईचा हट्ट, लग्नाची मागणी ते साखरपुडा…” ‘अशी’ सुरु झाली राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच