-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर आज(२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले.
-
कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत सप्तपदी घेत राणादा-पाठकबाईंनी लग्नगाठ बांधली.
-
हार्दिक व अक्षयाचा शाही विवाहसोहळा पुणे येथे पार पडला. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
अक्षयाने लग्नासाठी खास हातामागावर पैठणी विणून घेतली होती.
-
लाल रंगाच्या नऊवारी पैठणी साडीत अक्षयाचं सौंदर्य खुलून आलं होतं.
-
साडीवर नथ व दागिने परिधान करत अक्षयाने लग्नासाठी पारंपरिक लूक केला होता.
-
तर हार्दिक जोशी धोतरमध्ये राजबिंडा दिसत होता.
-
त्यांच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
-
अक्षया-हार्दिक या नव्या जोडप्याला चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अक्षया-हार्दिकच्या शाही विवाहसोहळ्यात मात्र पाठकबाईंच्या मंगळसूत्राची चर्चा रंगली आहे.
-
अक्षयाच्या मंगळसूत्राने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
-
काळे मणी व पेंन्डंट असलेल्या अक्षयाच्या मंगळसूत्राचे फोटो व्हायरल होत आहेत.
-
अक्षया-हार्दिकच्या शाही विवाहसोहळ्यातील खास क्षण.
-
(सर्व फोटो: इन्स्टाग्राम )
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…