-
अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर ही जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली.
-
आज (२ डिसेंबर) त्यांचा विवाहसोहळा पार पडला.
-
पुण्यात पारंपारिक पद्धतीने ते दोघेही विवाहबंधनात अडकले.
-
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ते दोघेही घराघरात पोहोचले.
-
या मालिकेत हार्दिक जोशीने राणादा ही भूमिका साकारली होती.
-
तर अक्षया देवधर ही या मालिकेत पाठकबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळाली.
-
राणादा आणि पाठकबाई ही जोडी छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरली होती.
-
त्यानंतर आता रील लाईफमधली ही जोडी आता रिअल लाईफमध्ये विवाहबद्ध झाल्याचे पाहायला मिळत आहे.
-
त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
-
हार्दिक अक्षयाने अतिशय पारंपारिक पद्धतीचा लूक लग्नाच्या विधींसाठी केला होता.
-
यावेळी तिने लाल रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती.
-
तर हार्दिकने लाल रंगाचं धोतर नेसलं आहे. त्यावर त्याने क्रिम रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
-
या कार्यक्रमातील अनेक लग्नाच्या विधींचे फोटो तिने शेअर केले आहेत.
-
यावेळी तिचे भाऊ हार्दिकचा कान पिळताना दिसत आहेत.
-
तर एका फोटोत हार्दिक अक्षयाला मंगळसूत्र परिधान करताना दिसत आहे.
-
तसेच एका फोटोत ते दोघेही लग्नाचे विधी पार पाडताना दिसत आहे.
-
या सर्वच फोटोत ते दोघेही आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात हार्दिक आणि अक्षया फारच आनंदी असल्याचे दिसत आहेत.
-
त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटोही समोर आले आहेत.
-
राणादा आणि पाठकबाई यांनी अक्षय्य तृतीया दिवशी साखरपुडा करत चाहत्यांना धक्का दिला होता.
-
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लग्नबंधनात अडकल्यानंतर अनेकांनी कमेंट करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही