-
अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर आज (२ डिसेंबर २०२२) विवाहबंधनात अडकले.
-
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ते दोघेही घराघरात पोहोचले.
-
या मालिकेत हार्दिक जोशीने राणा दा ही भूमिका साकारली होती.
-
तर अक्षया देवधर ही या मालिकेत पाठकबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळाली.
-
राणादा आणि पाठकबाई ही जोडी छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरली होती.
-
या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर चर्चेचा विषय ठरली.
-
पण खऱ्या आयुष्यातही हार्दिक व अक्षया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
रिल लाईफमधली ही जोडी आता रिअल लाईफमध्येही पती-पत्नी झाले आहेत.
-
हार्दिक-अक्षयाने पुण्यात पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधली.
-
या लग्नाच्या विधींसाठी त्यांनी खास लूक केला होता.
-
अक्षयाने लाला रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती.
-
या लूकसाठी तिने परिधान केलेले दागिने तर विशेष लक्षवेधी ठरले.
-
तर हार्दिकने लाल रंगाचं धोतर नेसलं होतं. त्यावर त्याने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधआन केला होता.
-
कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत सप्तपदी घेत राणादा-पाठकबाईंनी लग्नगाठ बांधली.
-
या खास क्षणी राणादाने भर मांडवात सगळ्यांसमोर पाठकबाईंना किस केलं.
-
दरम्यान, हार्दिक-अक्षयाच्या रिसेप्शनचे फोटोही आता समोर आले आहेत.
-
रिसेप्शनच्या कार्यक्रमात अक्षयाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.
-
तर हार्दिकने क्रीम रंगाचा सदरा आणि फेटा घातला होता.
-
यावेळी हार्दिक-अक्षया दोघेही खूप सुंदर दिसत होते.
-
हार्दिक आणि अक्षयाच्या रिसेप्शनचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
अक्षया-हार्दिकच्या जवळच्या मित्रपरिवाराने त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.
-
यावेळी अभिनेत्री वीणा जगताप ही देखील उपस्थित होती.
-
आमदार ऋतुराज पाटील यांनीही या जोडप्याला शुभेच्छा दिल्या.
-
नवरदेव आणि नववधू नवीन आयुष्य सुरु करण्यासाठी खूपच उत्सुक आणि आनंदी दिसत होते.
-
हार्दिक आणि अक्षयाचं रिसेप्शन अगदी ग्रँड होतं.
-
रिसेप्शनसाठी अक्षया आणि हार्दिकने खास जांभळ्या रंगाचे मॅचिंग कपडे परिधान केले होते. यावेळी दोघेही खूप सुंदर दिसत होते.
-
दोघांनीही यावेळी आपल्या पालकांचे आशीर्वाद घेऊन नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. (सर्व फोटो : Instagram)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”