-
‘सिंघम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल हिने याआधी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे.
-
अभिनय लूक यामुळे ती चर्चेत असतेच मात्र शिक्षणातदेखील ती पुढे आहे. तिने मार्केटिंग आणि जाहिरात क्षेत्रात आपली पदवी संपादन केली आहे.
-
दक्षिण भारतातील ‘मिल्की ब्युटी’ म्हणून प्रसिद्ध असलेली तमन्ना भाटिया देखील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी केवळ दक्षिणेतच नाही तर बॉलिवूडमध्येही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
मूळची मुंबईची असलेली तमन्नाने नॅशनल कॉलेजमधून बीए केले आहे.
-
पूजा हेगडे ही केवळ दक्षिणेतीलच नव्हे तर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती तिच्या आगामी ‘सर्कस’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
-
शिक्षणाच्या बाबतीत पूजा हेगडेने एमएमके कॉलेजमधून कॉमर्समध्ये पदवी घेतली आहे.
-
अभिनेत्री नयनताराचीदेखील दक्षिणेतील एक चर्चेतील नाव, अनेक सुपरहिट चित्रपट तिने दिले आहेत.
-
तिने विग्नेश शिवनबरोबर लग्न केले आहे. शिक्षणाच्याबाबतीत बोलायचं झालं तर तिरुवल्ला येथील मार्ट होम कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात पदवी घेतली आहे.
-
‘पुष्पा’ चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री समंथा दक्षिणेतील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली आहे.
-
नुकताच तिचा ‘यशोदा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तिने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली आहे.
-
‘बाहुबली’ चित्रपटामुळे सर्वांचं मन जिंकणारी देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात ,महागडी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
तिने आपले शिक्षण कॉम्पुटर क्षेत्रात केले असून यातील पदवीपर्यंतचे तिने शिक्षण घेतले आहे. फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल