-
‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत.
-
सध्या अभिनेता अक्षय केळकर हा बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आला आहे.
-
मराठी टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते.
-
सध्या अक्षय हा बिग बॉसच्या घरात चांगलाच चर्चेत आहे.
-
नुकतंच त्याने अभिनेत्री राखी सावंतचा हात पाहून भविष्य सांगितले आहे.
-
त्यावेळी तो म्हणाला, “राखी तुझी आणि माझी हातावरील एक रेषा समान आहे. त्यामुळे आपलं आयुष्य कमाल आहे.”
-
“तुझे आरोग्य फारच चांगले आहे”, असेही त्याने यावेळी म्हटले.
-
“तुझ्याकडे भरपूर मालमत्ता आहे. तसेच तू ज्या काही गुंतवणूक केल्या आहेस त्या प्रचंड आहेत. त्यामुळे तुला पैशांची कमतरता जाणवणार नाही.”
-
“तसेच आता कुठे तुझं लव्ह लाईफ बरं चाललं आहे.”
-
त्यानंतर त्याने त्याव्यतिरिक्त परफ्युम वैगरे असं काही आहे का? असे तिला विचारले.
-
त्यावर राखीने ‘मला अशी ऑफर आली आहे’, असा खुलासा केला. ‘राखी परफ्यूम असे मी त्याचे नाव ठेवणार आहे.’
-
त्यावर अक्षयने राखीला अजून काही तरी वेगळ्या नावाचा विचार कर, असा सल्ला दिला.
-
“पण हा बिझनेस चांगला चालेल. रादिल परफ्यूम असं नाव ठेवं. ते जास्त चांगलं वाटेल.”
-
“तुझ्या हाताला एक वेगळा सुगंध आहे.”
-
“जसं तू त्यादिवशी बिर्याणी केली होती. तेव्हा त्याला छान चव आली.”
-
त्यावर अक्षय हा तिला बघ तूच एकदा हाताचा सुगंध घेऊन बघ असे सांगतो.
-
ती नाकाजवळ हात घेताना अक्षय मस्करीत तिच्या नाकावर मारतो आणि हा प्रँक असल्याचे सांगतो

Video : जीव महत्त्वाचा की अहंकार? अँब्युलन्सला रस्ता देण्यासाठी बसने केले कारला ओव्हरटेक, पण पुढे जे घडले…; पुण्यातील एसबी रोडवरील व्हिडीओ व्हायरल