-
‘बिग बॉस १६’ या शोमधील बहुचर्चित सदस्यांमध्ये मराठमोठा शिव ठाकरे टॉपला आहे.
-
‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या पर्वाचं विजेतेपद शिवने पटकावलं.
-
याच कार्यक्रमामुळे शिव नावारुपाला आला.
-
हिंदी ‘बिग बॉस’मध्ये शिवने प्रवेश करताच प्रेक्षकांची मनं जिंकली.
-
शिवचा खेळ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.
-
मध्यंतरी सलमान खाननेही शिवचं कौतुक केलं होतं.
-
आता ‘बिग बॉस १६’ संपण्यापूर्वीच शिवला नवी ऑफर आली आहे.
-
‘टेलीचक्कर’च्या वृत्तानुसार शिव ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये झळकणार आहे.
-
‘खतरों के खिलाडी’च्या १३व्या सीझनसाठी त्याला विचारणा करण्यात आली होती.
-
शिवच्या मॅनेजरने ‘खतरों के खिलाडी’च्या निर्मात्यांशी संवाद साधला आहे.
-
इतकंच नव्हे तर ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसणार असल्याचं शोचे निर्माते व शिवच्या मॅनेजरचं ठरलं आहे.
-
म्हणजेच ‘बिग बॉस’च्या घरामधून बाहेर येण्यापूर्वीच शिवचं नशीब उजळलं आहे. (सर्व फोटो – फेसबुक)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”