-
मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
शरद पोंक्षे यांचे स्त्री वेशातील फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
-
नऊवारी साडी, अंबाडा, नाकात नथ व कपाळावर टिकली अशा पारंपरिक मराठमोळ्या स्त्रीच्या वेशातील शरद पोंक्षे यांच्या फोटोंनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
-
शरद पोंक्षे यांच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
-
हे फोटो त्यांच्या ‘दार उघड बये’ या मालिकेतील आहेत. या मालिकेत ते रावसाहेब ही खलनायकाची भूमिका साकारत आहेत.
-
मालिकेत मुक्ता-सारंग यांचं लग्न रावसाहेबांना मान्य नाही. त्यामुळे ते दोघांनाही त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत.
-
तर दुसरीकडे रावसाहेबांनी आर्याच्या बाबांना शब्द दिला आहे. आर्याच नगरकरांची सून म्हणून या घरात दिसेल आणि तसं झालं नाही तर मी स्वतः रावसाहेब बाईचा वेश घालून हातात बांगड्या भरून दिवसभर घरात फिरेन.
-
रावसाहेब मुक्ता-सारंगसमोर प्रत्येकवेळी नवीन आव्हानं उभी करणार आहेत आणि या आव्हानांना मुक्ता सडेतोड उत्तर देताना मालिकेत दिसणार आहे. यात तिला नवऱ्याची म्हणजेच सारंगची साथ मिळणार आहे.
-
मुक्ताने स्विकारलेल्या प्रत्येक आव्हानांमुळे रावसाहेबांचा पुरुषी अहंकार दुखावला जाणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
-
या सगळ्याचा परिणाम म्हणजे रावसाहेब स्वतःला घरातल्यांसमोर बाईच्या वेशात हातात बांगड्या घालून फिरताना आरशात बघणार आहेत.
-
त्यामुळे मुक्ता पुरुषी मक्तेदारीला छेद देऊन घरातील स्त्रियांना सन्मान मिळवून देणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. (सर्व फोटो: झी मराठी)
७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?