-
छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जातं.
-
‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून वीणा जगताप हिच्याकडे पाहिले जाते.
-
ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते.
-
नुकतंच वीणा जगतापने शिव ठाकरेसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
-
शिव ठाकरेने बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व जिंकले होते.
-
या पर्वानंतर आता शिव हा बिग बॉस १६ मध्ये सहभागी झाला आहे. या कार्यक्रमाद्वारे त्याने हिंदी रसिकांची मनं जिंकताना दिसत आहे.
-
नुकत्याच एका एपिसोडमध्ये शिव ठाकरेला अश्रू अनावर झाले आणि तो रडताना दिसला.
-
नेहमीच खंबीर राहणाऱ्या शिवला रडताना पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
-
त्यानंतर आता वीणाने शिव ठाकरेला पाठिंबा दिला आहे.
-
वीणाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने शिवचा बिग बॉसच्या घरातील रडताना व्हिडीओ पोस्ट केला आहे.
-
या पोस्टबरोबर तिने शिवसाठी खास कॅप्शनही दिले आहे.
-
“वाघ आहेस तू…. रडू नकोस अजिबात… मी आहे सोबत नेहमी” असे तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे.
-
याबरोबर तिने रेड हार्ट इमोजीही शेअर केले आहे.
-
वीणाच्या या पोस्टमुळे चर्चांना उधाण आले आहे. ते दोघेही लवकरच एकत्र येणार असल्याचेही बोललं जात आहे.
-
शिव ठाकरे आणि वीणा जगताप ही जोडी बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीझोतात आली.
-
शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांची लव्हस्टोरी खूप गाजली.
-
बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये प्रेम फुललं होतं.
-
शिव-वीणा या दोघांनीही सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दलची कबुली दिली होती.
-
त्यावेळी वीणाबरोबरच्या नात्यावरुन शिवला ट्रोल करण्यात आलं होतं. बिग बॉसचा शो जिंकण्यासाठी त्याने पब्लिसिटी स्टंट केला होत, असे काहींचे म्हणणे होते.
-
मात्र त्यानंतर वीणाबरोबर नातं बिग बॉसचा शो जिंकण्यासाठी केलेला पब्लिसिटी स्टंट नव्हता. मी खरंच तिच्या प्रेमात आहे, अशी कबुली शिवने दिली होती.
-
वीणानेही तिच्या हातावर ‘शिव’ नावाचा टॅटू काढत प्रेम व्यक्त केलं होतं.
-
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्या दोघांचं नातं छान बहरलं होतं. त्यामुळे त्यांचे चाहतेही आनंदात पाहायला मिळाले.
-
वीणा आणि शिव हे त्यावेळी सतत एकमेकांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना पाहायला मिळाले.
-
शिव व वीणा या घरातून बाहेर पडल्यावर लग्न करणार असल्याचे त्यांनी बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल देखील केले होते.
-
मात्र बाहेर आल्यानंतर शिवने या विषयावर माझ्या कुटुंबियांशी मी बोलणार आहे, असे सांगितले होते.
-
शिवच्या आईला सुरुवातीला स्क्रीनवर दाखवण्यात आलेल्या काही गोष्टी खटकल्या होत्या.
-
मात्र त्यानंतर वीणा शिवच्या आईलादेखील भेटली. त्यांच्या भेटीचा फोटो शिवने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
-
शिव व वीणाची केमेस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडली होती.
-
वीणाने शिवच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नावाचा टॅटू तिच्या हातावर काढला.
-
बिग बॉस मराठी २ हे पर्व शिव आणि वीणा यांच्या लव्हस्टोरीमुळे चांगलाच गाजला. या दोघांच्या केमिस्ट्रीमुळे बिग बॉसला चार चांद लागले होते.
-
विशेष म्हणजे वीणाने शिवच्या नावाचा टॅटूही हातावर गोंदवून घेतला होता. तसेच शिव बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर तिने जंगी सेलिब्रेशनही केले होते.
-
मात्र काही महिन्यांनी त्यांचा ब्रेकअप झाला होता.
-
त्यानंतर वीणाने शिवच्या नावाचा टॅटूही काढून टाकला होता.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य