-
महेश मांजरेकर दिग्दर्शिक ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाशी अक्षय कुमारचं नाव जोडलं गेलं.
-
या चित्रपटामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचं घोषित करण्यात आलं.
-
त्यानंतर अक्षयला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये पाहण्यास प्रेक्षकही बरेच उत्सुक होते.
-
आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमधील त्याचा लूक समोर आला आहे.
-
अक्षयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये अक्षय चालत येताना दिसत आहे.
-
अक्षयची चाल, भेदक नजर विशेष लक्ष वेधून घेत आहे.
-
अक्षयला ऐतिहासिक भूमिकेमध्ये पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
काहींनी अक्षयच्या या लूकवर नकारात्मक कमेंट केल्या आहेत.
-
तू या भूमिकेसाठी योग्य नाहीस, या भूमिकेसाठी शरद केळकरला का नाही घेतलं, तुला अभिनय करता येत नाही अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील अक्षय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही.
-
(सर्व फोटो – फेसबुक, इन्स्टाग्राम)
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही