-
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या शोचा पहिला भाग प्रदर्शित झाला.
-
या शोमध्ये फराह खानने पाहुणी कलाकार म्हणून हजेरी लावली होती. मलायकाने फराहशी तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांबद्दल चर्चा केली.
-
मलायकाने अर्जुन कपूर व तिच्या नात्याबद्दलही उघडपणे भाष्य केलं.
-
काहीच दिवसांपूर्वी मलायका अर्जुन कपूरच्या बाळाची आई होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याबाबतही मलायकाने तिचं मत व्यक्त केलं आहे.
-
अर्जुनबरोबर भविष्याबाबत तुझा काय प्लॅन आहे? तू आणि अर्जुन लग्न करणार आहात का? तुला पुन्हा आई व्हायचंय का? असे प्रश्न फराह खानने या शोमध्ये मलायकाला विचारले.
-
यावर उत्तर देत मलायका म्हणाली, “अर्थातच मी आणि अर्जुन याबद्दल बोललो आहोत. आपण सगळेच आपल्या पार्टनरबरोबर अशा गोष्टीवर बोलतोच”.
-
“मला वाटतं मी एका नात्यात खूप उत्तम व्यक्ती आहे. माझ्या आयुष्यात मी आजपर्यंत जे काही निर्णय घेतले आहेत ते सगळे यासाठी घेतले होते कारण मला आनंदी राहायचं होतं”, असंही ती पुढे म्हणाली.
-
पुढे ती म्हणाली, “आज माझ्या आयुष्यात जो माणूस आहे तो मला आनंदी ठेवत आहे. त्यावर आता लोक काय बोलतात याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही”.
-
मलायकाने पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानसह १९९८ साली लग्न केलं होतं.
-
परंतु, १८ वर्षांनंतर २०१७ मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे.
-
सध्या मलायका बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. (सर्व फोटो: इंडियन एक्सप्रेस)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख