-
दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या तिच्या राजेशाही थाटातल्या विवाहसोहळ्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच, ४ डिसेंबर रोजी हंसिकाने आपला प्रियकर उद्योगपती सोहेल कथुरियाबरोबर लग्न केले.
-
हंसिका आणि सोहेलने राजस्थानमधील जयपूर येथील तब्बल ४५० वर्षे जुन्या मुंडोटा फोर्ट आणि पॅलेसमध्ये लग्नाच्या सर्व विधी पार पडल्या. याच दरम्यान, हंसिकाच्या हनीमूनबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
-
रिपोर्ट्सनुसार, हंसिका मोटवानीने तिच्या शाही लग्नासाठी कामातून बराच काळ ब्रेक घेतला होता.
-
हंसिकाला तिच्या पतीसह खास वेळ घालवायचा आहे. डेस्टिनेशन वेडिंगनंतर या जोडप्याने त्यांच्या हॅप्पी हनीमूनसाठी खास प्लॅन्सही आखले आहेत.
-
पण आता सोहेलसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर हंसिका शूटिंग मोडमध्ये येणार असल्याची बातमी आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, लग्नाच्या दोन दिवसांनंतरच हंसिका आपल्या पतीपासून दूर झाली आहे.
-
हंसिका आणि सोहेल या दोघांनीही हनिमूनचा छान बेत आखला असला तरी हनिमूनला जाण्यापूर्वी हंसिकाला काही कामे पूर्ण करायची आहेत.
-
हंसिका ६ डिसेंबरलाच कामावर परतली असून ती एका ब्रँड शूटच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
-
हंसिका आणि सोहेल यांनी त्यांच्या हनिमूनसाठी अतिशय रोमँटिक ठिकाण निवडले आहे. या जोडप्याची बुकिंगही पूर्ण झाली असून दोघेही डिसेंबरच्या शेवटी आपल्या हनिमूनला जातील.
-
म्हणूनच, हंसिकाच्या सुट्टीचा ब्रेक या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. लग्नानंतरची उर्वरित कामे पूर्ण करूनच हंसिका हनिमूनला रवाना होणार आहे. हे जोडपे हनिमूनला एकत्र नवीन वर्षाची सुरुवात करणार असल्याची माहिती मिळाली आहे. (Photos: hansika.officiaal/Instagram)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख