-
मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटानंतर आता आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
दिग्दर्शक महेश मांजेरकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला.
-
महेश मांजेरकरांच्या या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची वर्णी लागली आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
मात्र सोशल मीडियावर अक्षयला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत अक्षय कुमार अजिबात शोभून दिसत नसल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
-
मात्र या आधीही अनेक कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पार पाडली आहे. ही भूमिका साकारताना या कलाकारांनी विशेष मेहनत घेतली. मात्र, यामधील काही कलाकारांनी या भूमिकेत वेगळीच छाप उमटवली आहे.
-
अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ या चित्रपटात अभिनेता शरद केळकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यावेळी त्याचं विशेष कौतुक झालं होतं.
-
‘शिवप्रताप- गरुडझेप’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेते डॉ. अमोल कोल्हे प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही.
-
याआधी त्यांनी ‘राजा शिवछत्रपती’ आणि ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकांमध्येही महाराजांची भूमिका साकारली आहे. अमोल कोल्हे हे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी ओळखले जातात.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता भुषण प्रधानने छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली आहे.
-
भूषण प्रधानने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी प्रचंड अभ्यासदेखील केला होता.
-
प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर ‘शेर शिवराज’ या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर याने शिवाजी महाराजांची भूमिका बजावली.
-
दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण ८ चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गश्मीर महाजनीने प्रवीण तरडे लिखित दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात महाराजांची भूमिका पार पाडली.
-
गश्मीरने या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अशी दुहेरी भूमिका साकारली आहे.
-
२००९ सालच्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेबद्दल बरीच चर्चा झाली. हा चित्रपट, त्यातली गाणी आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत.
-
स्वराज्यरक्षक संभाजी या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित मालिकेमध्ये अभिनेता शंतनू मोघे याने छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती.
-
शंतनूने साकारलेल्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ उलटला असला तरीही शंतनूने साकारलेले शिवाजी महाराज अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
-
या सर्व कलाकारांपैकी शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेला तुमचा आवडता अभिनेता कोण हे नक्की सांगा. (सर्व फोटो: इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच