-
६ डिसेंबरला फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचा वाढदिवस होता.
-
त्याच्या वाढदिवसाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
दिग्गज अभिनेत्री रेखा यादेखील या वाढदिवसाच्या पार्टीत हजर होत्या.
-
त्यांनी मनीष मल्होत्राबरोबर फोटोशूटही केलं.
-
या वाढदिवसाच्या पार्टीतील फोटोंमध्ये रेखा आणि रवीना टंडन एकत्र दिसल्या.
-
तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण रेखा आणि रवीना दोघी एकमेकींशी बोलायच्या नाहीत.
-
होय. हे खरंय. दोघींनी खिलाडीयो का खिलाडीमध्ये एकत्र काम केलं होतं. नंतर त्या पुन्हा कधीच एकत्र दिसल्या नाहीत.
-
त्याचं कारण अभिनेता अक्षय कुमार होता.
-
रवीना आणि अक्षयचं अफेअर होतं. आणि तेव्हा अक्षय रेखांच्या खूप जवळ जात असल्याचं तिला जाणवलं.
-
एके दिवशी अक्षय आणि रेखा एकत्र शूट करत होते, तेव्हा रवीना तिथे पोहोचली आणि तिने दोघांना एकत्र पाहिलं.
-
हे बघून रवीना टंडन खूप चिडली आणि तिने रेखांना शिवीगाळ केल्याचं म्हटलं जातं.
-
अक्षयने रवीनाला कसंतरी समजावलं आणि शांत केलं, पण नंतर तिने अक्षयवर लग्नाचा दबाव आणला.
-
रेखाही त्यानंतर अक्षयपासून दूर झाल्या.
-
त्यानंतर आज अनेक वर्षांनी मनीष मल्होत्राच्या वाढदिवसानिमित्त दोघी अभिनेत्रींना एकत्र पाहिलं गेलं.
-
(Photo: Manish Malhotra/Instagram आणि इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”