-
८ डिसेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा ७८ वा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजस्थानमधील जैसलमेर इथं कुटुंबियांनी सेलिब्रेशन केलं. वाढदिवसाला त्यांचा मुलगा आणि अभिनेता सैफ अली खान, करीना कपूर, सोहा अली खान, लेक सबा अली खान आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते.
-
करीना कपूर खानने सासूबाईंबरोबरचा एक खास फोटो शेअर केला आणि “माझा सुंदर सासूबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा” असं कॅप्शन दिलं. (Photo: Kareena Kapoor Khan/Instagram)
-
सबा पटौदीनेही आईबरोबरचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या. “वाढदिवसाच्या शुभेच्छा..लव्ह यू ❤️!” असं कॅप्शन तिने दिलं. (Photo: Saba Pataudi/Instagram)
-
सबाने या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील खूप फोटो शेअर केले आहेत. (Photo: Saba Pataudi/Instagram)
-
जैसलमेरच्या डेजर्ट कॅम्पमध्ये शर्मिला यांनी केक कापला. (Photo: Saba Pataudi/Instagram)
-
सैफ आई शर्मिलाला केक भरवताना (Photo: Saba Pataudi/Instagram)
-
सोहाने आईबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केलाय. “वाढदिवसाच्या शुभेच्छा माय डार्लिंग अम्मा! स्पाईस जेटने आपल्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पण आपण भेटलोच,” असं कॅप्शन तिने दिलंय. (Photo: Soha Ali Khan/Instagram)
-
सोहाने आई शर्मिला आणि बहीण सबासमवेत फोटो शेअर केला. (Photo: Soha Ali Khan/Instagram)
-
सोहाने तिची लेक इनाया आणि सैफ-करीनाचा लेक तैमुरचाही एक फोटो शेअर केला आहे. (Photo: Soha Ali Khan/Instagram)

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”