-
गेल्या २ वर्षात अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. एक-एक करून आपण या सर्व सेलिब्रिटींच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पाहिले.
-
९ डिसेंबर २०२१ ला अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरीना कैफ यांनी लग्नगाठ बांधली. अतिशय गुप्त पद्धतीने त्यांनी लग्न केले असले तरीही त्यांचे लग्न २०२१ मधील सर्वाधिक चर्चेत राहिलेले लग्न ठरले.
-
नुकतंच विकी आणि कतरिनाने आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस थंड हवेच्या ठिकाणी एकत्र साजरा केला. यासंबंधीचे फोटो विकी आणि कतरिनाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
कतरिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर करत विकीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले, “माय रे ऑफ लाइट. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!”
-
विकीनेही काही रोमँटिक फोटो पोस्ट करत आपल्या लाडक्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
विकीने या फोटोसाठी अतिशय सुंदर कॅप्शन लिहिले आहे. त्याने म्हटलंय, “वेळ खूप पटापट जातो. पण तुझ्याबरोबर तो अतिशय सुंदर पद्धतीने जातो. तुला आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की तू कधी विचारही करू शकत नाहीस.”
-
दोघांनीही वेगवेगळे फोटो पोस्ट केले असून यावरून आपण त्यांच्या आनंदाचा अंदाज लावू शकतो. यावेळी ते वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसत आहेत.
-
विकी आणि कतरिनाच्या या पोस्ट्सवर त्यांच्या चाहत्यांनी सुंदर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
-
सर्व फोटो: कतरीना कैफ/विकी कौशल – इन्स्टाग्राम

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”