-
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही प्रेक्षक सावरलेले नाहीत. सिद्धार्थ शुक्ला ४० वर्षांचा होता आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे. आज सिद्धार्थची जयंती आहे.
-
सिद्धार्थचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. कमी वेळेत त्याने अनेक चाहत्यांचे मनं जिंकली होती.
-
सिद्धार्थ शुक्लाला टीव्ही सीरियल ‘बालिका वधू’मधून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. तो ‘दिल से दिल तक’ या मालिकेतही दिसला. त्याने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
बिग बॉस १३ मधून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. पंजाबी अभिनेत्री शहनाज गिलसोबत त्यांच्या जोडीला चांगलीच पसंत मिळाली होती.
-
आज सिद्धार्थच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्याने सोशल मीडियावर शेअर केलेली १० ट्वीट पाहुयात. या १० ट्वीटमधून त्याने त्याच्या चाहत्यांना सर्वात मोठे आयुष्याचे धडे दिले आहेत.
-
सिद्धार्थ या ट्वीटमध्ये म्हणतो, “दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात किंवा विचार करतात याची चिंता करू नका, आयुष्य फार लहान आहे, त्याचा आनंद घ्या आणि लोकांना बोलू द्या.”
-
या ट्वीटमधून सिद्धार्थने सोशल मीडियावर होणाऱ्या तुलनेवर भाष्य केलं आहे.
-
या मजेशीर ट्वीटमध्ये सिद्धार्थने त्याला शाळेत असताना पडलेल्या प्रश्नाचा खुलासा केला आहे. तो म्हणतो, “जसं शाळेत एकच शिक्षक सगळे विषय शिकवू शकत नाही, तर एकच विद्यार्थी सगळे विषय कसे शिकून घेऊ शकेल?”
-
या ट्वीटमध्ये त्याने असं लिहिलं आहे की, “ज्यांना व्यंग समजत नाही ते खूपच स्मार्ट असतात.”
-
सिद्धार्थ या ट्वीटमध्ये म्हणाला, “आयुष्यात एवढं नाव कमवा की लोक तुम्हाला हरवायचा प्रयत्न नाही तर षड्यंत्र रचतील.”
-
“चूक करा पण कधीच कोणत्याही गोष्टीचा पिच्छा सोडू नका.” असा संदेश सिद्धार्थने या ट्वीटच्या माध्यमातून दिला होता.
-
या ट्वीटमधून सिद्धार्थने भविष्याला कसा आकार द्यावा याबद्दल भाष्य केलं आहे.
-
कोरोनाच्या आधीपासूनच लोक चेहेऱ्यावर वेगवेगळे मुखवटे घेऊन वावरत होते, अशी मार्मिक टिप्पणी सिद्धार्थने या ट्वीटच्या माध्यमातून केली होती.
-
सिद्धार्थची ही ट्वीट सध्या सोशल मीडियावर पुन्हा शेअर केली जात आहेत.
-
सिद्धार्थ शेवटी ‘ब्रोकन बट ब्युटिफूल’ या सिरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये झळकला होता. (फोटो सौजन्य : लोकसत्ता आणि सोशल मीडिया / सिद्धार्थ शुक्ला)
![Mangal Gochar 2024](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2024-07-24T185145.333-1.jpg)
येणाऱ्या ४७ दिवसात मंगळ देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार