-
अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज पुण्यतिथी.
-
त्यांचा मुलगा प्रतीक बब्बर हा मनोरंजन सृष्टीत कार्यरत असून उत्तमोत्तम भूमिका साकारताना दिसतो.
-
सुरुवातीपासूनच प्रतीकची तुलना त्याची आई दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याशी होत आली आहे.
-
नुकतंच एका मुलाखतीत त्याने त्याची आई दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि त्याच्यामध्ये केल्या जाणाऱ्या तुलनेबद्दल भाष्य केलं होतं.
-
“माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण या सगळ्यात माझी आई ही माझी प्रेरणाशक्ती राहिली आहे.”
-
“माझं कुटुंब, माझं ध्येय आणि स्वप्ने यांनी मला पुढे जाण्याचं प्रोत्साहन दिलं आहे.”
-
“अनेकांनी मला नाकारले, आयुष्यभर अनेक गोष्टी सांगितल्या, मला त्या चुकीच्या सिद्ध करायच्या आहेत.”
-
“प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं एक उत्तम अभिनेता बनून सुपरहिट चित्रपट द्यावेत.”
-
“एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट द्यावेत आणि पैसे कमवावेत, नाव कमवावं असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं.”
-
“पण माझं ध्येय वेगळं आहे.”
-
“मला माझ्या आईकडून मिळालेला वारसा पुढे न्यायचा आहे.”
-
“स्मिता पाटील यांचा मी मुलगा आहे या गोष्टीला मला न्याय द्यायचा आहे,” असं प्रतीकने सांगितलं होतं.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख