-
नोरा फतेही ही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट डान्सर आहे. सौंदर्याबरोबरच आपल्या नृत्याच्या माध्यमातून तिने चाहत्यांवर भुरळ पाडली आहे.
-
नोरा सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. तिच्या फोटोंवर नेटकरी कायमच पसंती दर्शवत असतात.
-
सध्या नोरा फतेही कलर्स टीव्हीवरील ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमाचे परीक्षण करत आहे.
-
मूळची कॅनडाची असलेल्या नोराने मुंबईत येऊन आपले स्थान तर निर्माण केलेच त्याचबरोबरीने तिने कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावली आहे.
-
नोराचे मुंबईत आलिशान घर आहे, ज्याची किंमत सुमारे १० कोटी रुपये आहे. त्याचबरोबर या घराचे इंटीरियर पीटर मारिनोने डिझाइन केले आहे.
-
नोराच्या घराशिवाय तिची व्हॅनिटी व्हॅनही खूप खास आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या लक्झरी व्हॅनिटी व्हॅनची किंमत सुमारे ५ कोटी रुपये आहे.
-
नोराला बॅग्सची खूप क्रेझ आहे. नोरा बॅगची किंमत ७ लाख रुपये आहे. आज जरी ती आलिशान जीवन जगत असली तरी तिलादेखील संघर्ष करावा लागला आहे.
-
ती कॅनडाहून फक्त ५ हजार रुपये घेऊन भारतात आली होती. त्यानंतर तिने येथे येऊन कठोर परिश्रम केले, त्यामुळेच ती हे स्थान मिळवू शकली आहे.
-
नोरा आज जवळपास ३० कोटींची मालकीण आहे. नुकताच तिने जॅकलिन फर्नांडिस विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बोल्ड कंटेंटमुळे थिएटरमध्ये प्रदर्शित न होऊ शकलेले ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी