-
शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
चित्रपटाची चाहते वाट बघत असतानाच तीन दिवसांपूर्वी चित्रपटातील पहिलं गाणं ‘बेशरम रंग’ प्रदर्शित झालं. गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला, पण काही कारणांमुळे ते वादात सापडलंय.
-
गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे, त्यामुळे हिंदू महासभेसह भाजपा नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे.
-
गाण्यातील बोल्ड दृश्ये आणि दीपिकाने परिधान केलेली भगवी बिकिनी, यामुळे हिंदूंचा अपमान होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
-
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी तर गाण्याचे बोल आणि दीपिकाचे सीन न बदलल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही दिलाय.
-
दरम्यान, भगव्या रंगाचे कपडे परिधान चित्रपटात बोल्ड सीन्स देणारी दीपिका ही पहिली अभिनेत्री नाही. यापूर्वी अनेक अभिनेत्रींनी भगव्या कपड्यांमध्ये रोमँटिक आणि बोल्ड सीन्स दिले आहेत.
-
Sushmita Sen: सुश्मिता सेनने ‘मैंने प्यार क्यूं किया’ चित्रपटातील एका गाण्यात भगवी साडी नेसून सलमान खानबरोबर रोमान्स केला होता. ‘लगा रे प्रेम रोग’ या गाण्याला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं होतं. (Photo: Screen Grab)
-
Madhuri Dixit: माधुरी दीक्षित ‘बेटा’ चित्रपटातील ‘धक धक करने लगा’ गाण्यात भगवे कपडे परिधान करून दिसली होती. हे गाणं त्या काळचं सर्वात हिट होतं. (Photo: Screen Grab)
-
Raveena Tandon: रवीना टंडनने ‘मोहरा’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर भगवी साडी परिधान करून रोमान्स केला होता. हे गाणंही सुपरहिट ठरलं होतं. (Photo: Screen Grab)
-
Kajol: काजोल फिल्म ‘दिलवाले’मध्ये भगवी साडी नेसून शाहरुखशी रोमान्स करताना दिसली होती. (Photo: Screen Grab)
-
Akshay Kumar: कतरिना कैफने ‘सूर्यवंशी’ चित्रपटात ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यात भगवी साडी नेसून अक्षय कुमारबरोबर रोमान्स केला होता. पर भगवा साड़ी पहन अक्षय कुमार संग रोमांस किया था।
-
Disha Patani: दिशा पटानीने सलमान खानबरोबर ‘भारत’ चित्रपटात भगव्या साडीत बोल्ड डान्स केला होता. (Photo: Screen Grab)

१९ वर्षीय भाचा मामीला घेऊन पळाला, संतापलेल्या मामाने मोठ्या बहिणीला संपवलं