-
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा आगामी ‘पठाण’ हा चित्रपट सध्या तुफान चर्चेत आहे.
-
या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याच्या चित्रणावर सर्वत्र टीका होताना दिसतेय.
-
शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘पठाण’ ह्या चित्रपटाचं चित्रीकरण बरेच महिने सुरू होतं.
-
या चित्रपटासाठी शाहरुख, दीपिका आणि जॉन यांनी खूप मेहनत घेतली आहे.
-
या मेहनतीसाठी त्यांना मानधनाच्या स्वरूपात चांगलंच मोठं फळ मिळालं आहे.
-
निर्माता आदित्य चोप्राने ‘पठाण’च्या बजेटवर पैसे खर्च करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
-
एका मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी शाहरुख खानने तब्बल १०० कोटी रुपये मानधन आकारलं आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाला होणाऱ्या नफ्यातही त्याने हिस्सा मागितला आहे.
-
तर दीपिका पादुकोणने या चित्रपटासाठी १५ कोटी फी घेतली आहे.
-
अभिनेता जॉन अब्राहम याने या चित्रपटासाठी २० कोटी रुपये मानधन आकारल्याचं समोर आलं आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”