-
‘पावनखिंड’ या चित्रपटात ‘बहिर्जी नाईक’ ही भूमिका साकरणारा अभिनेता हरीश दुधाडे हा लग्नबंधनात अडकला आहे. नुकतंच त्याने त्याच्या आयुष्याची नवी इनिंग सुरु केली आहे.
-
हरीशने इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. यात ते दोघेही फारच सुंदर दिसत आहे.
-
हरीशने यावेळी छान सदरा लेहंगा आणि फेटा असा पारंपारिक लूक केला आहे. तर त्याच्या पत्नीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.
-
हरीश दुधाडेच्या पत्नीचे नाव समृद्धी निकम असे आहे.
-
“आणि नवीन प्रवासाला सुरुवात…” असे त्याने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे. त्याबरोबरच त्याने #wedding #weddingday #happilymarried असे हॅशटॅगही शेअर केले आहेत.
-
अभिनेता अंकित मोहनने त्याला हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्या दोघांचे लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
-
त्यात हरीश आणि त्याची पत्नी हे दोघेही वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे. याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
-
“भाग्यवान लोकांच्या क्लबमध्ये स्वागत आहे. तुमच्या दोघांसाठी मी आनंदी आहे. खूप खूप प्रेम”, असे अंकितने यात म्हटले आहे.
-
“माझं प्रेम दुसऱ्या कोणाचं प्रेम होताना…” असेही त्याने यात लिहिले आहे.
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…