-
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण ही कायमच चर्चेत असते.
-
ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असल्याचे पाहायला मिळते.
-
ती अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. तिचे हे सर्व फोटो चर्चेचा विषय ठरताना दिसतात.
-
अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगणने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नाही.
-
न्यासा ही बॉलिवूडमध्ये फारशी सक्रीय नसली तरी तिचा चाहता वर्ग प्रचंड आहे.
-
नुकतंच न्यासाची आई काजोलने तिच्या जन्मानंतरच्या पहिल्या वाढदिवसाचा एक किस्सा सांगितला आहे.
-
काजोल आणि अजयने न्यासाचा पहिला वाढदिवस साजराच केला नाही, असे तिने एका मुलाखतीत सांगितले.
-
“लेकीच्या जन्मानंतर मी धास्तावलेले होते. आईच्या मनात आपल्या बाळाविषयी, त्याच्या सुरक्षतेविषयी नेहमी एक प्रकारची चिंता असते.”
-
“बाळाचे आरंभीचे १२ महिने कठीण असतात. बाळ रात्रभर रडतं, वेळी-अवेळी झोपतं. कधी बाळाला उलट्या होतात, त्याचं वाढणारं बाळसं आईची झोप उडवतं.”
-
“मातृत्वाचा आनंद म्हणायला ठीक आहे पण मी न्यासाच्या वेळी खरंच घाबरलेली होते.”
-
“मला अजयने, आईने आणि इतर कुटुंबाने तिचा पहिला वाढदिवस कसा साजरा करायचा” असा प्रश्न विचारला होता.
-
“पण मी तिचा पहिला वाढदिवस साजरा करायला नकार दिला. आम्ही तो सेलिब्रेट केला नाही.”
-
“त्यादिवशी आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन आलो. काही किरकोळ वस्तू घेतल्या आणि घरी आलो.”
-
“त्यानंतर जेव्हा तिला कळायला लागल्यावर आम्ही तिचे वाढदिवस थाटामाटात करायला सुरुवात केली”, असे काजोलने सांगितले.
-
दरम्यान न्यासा ही लोकप्रिय स्टार किड्समध्ये गणली जाते. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश