-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री केतकी चितळे ‘आंबट गोड’ मालिकेतून घराघरात पोहोचली.
-
केतकी तिच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. यामुळे अनेकदा ती वादाच्या भोवऱ्यातही अडकलेली आहे.
-
नुकतंच केतकीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. परंतु, ही पोस्ट नंतर तिने डिलिट केली.
-
या पोस्टमध्ये तिने “समिती कुठली, कशासाठी निर्माण करण्याचा विचार का आला असेल? याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नाही. सनातन धर्माला मारणे ते ही महाराजांचे नाव घेऊन हा आमचा उद्देश”, असं म्हटलं होतं.
-
पुढे ती म्हणते “स्वघोषित मावळे तर तसंही माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा (मुळात राजमुद्रा राजा सोडल्यास कुणा दुसऱ्याने वापरणे फक्त बेकायदेशीरच नव्हे तर घोर अपमान आहे. पण आम्ही स्वघोषित असल्याने काहीही करायला मोकळे आहोत. अगदी ज्या राजाच्या नावाने लढतो, त्याचा अपमानही) लावून तयार असतातच”.
-
“एक मेसेज मिळताच किक मारुन अशुद्ध मराठीत (महाराजांना सहा भाषा अस्खलित येत असत. इकडे मातृपितृ भाषेची बोंब असो) आरडाओरडा सुरू”, असंही तिने म्हटलं होतं.
-
केतकीने पुढे “सनातनी हिंदू मारला जात आहे. मालवणी ऑर्लिम, मुंबईमध्ये मुसलमान किंवा क्रिस्ती आहेत. आणि सनातनी हिंदूला घर दिले जात नाही, ही सत्य परिस्थिती मी स्वत: अनुभवली आहे”, असं म्हटलं होतं.
-
“चार पैश्यात घोषणा करा. जातीयवाद निर्माण करा. सनातनी हिंदू झोपला आहे, याचा फायदा घ्या. जे जागे आहेत त्यांना तुरुंगात टाका व केसेस ठोका”, असंही केतकीने म्हटलं होतं.
-
“पण लक्षात असू द्या…झोपलेला जेव्हा जागा होतो तेव्हा तो पेटून उठतो”, असंही केतकीने म्हटलं होतं.
-
केतकीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे तिला तुरुंगातही जावं लागलं होतं.
-
(सर्व फोटो: केतकी चितळे/ इन्स्टाग्राम)
नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच