-
२०२२ हे वर्ष ब्रेकअप, घटस्फोट आणि लग्न या सर्व घडामोडींमुळे विशेष चर्चेत राहिले. या वर्षात अनेक लोकप्रिय जोड्या लग्नबंधनात अडकल्या तर अनेक जोड्यांनी आपल्या नात्याला पूर्णविराम दिला.
-
यासंबंधीच्या बातम्यांमुळे या जोड्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून याच कारणाने त्या या वर्षी सर्वाधिक चर्चेत राहिल्या. आज आपण या जोड्यांविषयी जाणून घेऊया.
-
अभिनेत्री मानसी नाईक पती प्रदीक खरेरापासून घटस्फोट घेणार आहे. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर आणि एकमेकांबरोबरचे फोटो डिलिट केल्यानंतर त्याच्या घटस्फोटांच्या चर्चांना सुरुवात झाली होती.
-
यासंबंधीच्या अनेक चर्चा रंगल्यानंतर स्वतः मानसी नाईकने याची कबुली दिली. याबाबतीत एक पोस्ट शेअर करून तिने आपल्या पतीवर अनेक आरोपदेखील केले होते. यावर ‘इतर कोण माझ्याबद्दल काय बोलतं याचा मला फरक पडत नाही, कारण मला माहितेय मी कोण आहे आणि याचा मला अभिमान आहे.’ अशा शब्दात प्रदीपने आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
‘बिगबॉस मराठी पर्व २’मध्ये लव्हबर्ड म्हणून ओळखले जाणारे शिव ठाकरे आणि वीणा जगताप २०२२ या वर्षात विभक्त झाले. या पर्वातील त्यांची प्रेमकहाणी चाहत्यांनाही खूपच आवडली होती. या कार्यक्रमानंतर ते अनेकवेळा एकत्रही दिसले होते.
-
सध्या शिव बिगबॉस १६ मध्ये दिसत असून तो या पर्वातील आघाडीच्या स्पर्धकांपैकी एक आहे. या कार्यक्रमदारम्यान स्वतः शिवने तो आणि वीणा वेगळे झाले असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केले.
-
बिगबॉस मराठी २ मध्ये शिवने वीणाच्या नावाचा टॅटू काढला होता. शिवने वीणाच्या नावाचा टॅटू काढून टाकल्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आले. हे दोघेही आता वेगळे झाले असले तरीही लवकरच वीणा शिवला सोबत द्यायला लवकरच बिगबॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
-
अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय २०२१ मध्ये घेतला. यावर्षी म्हणजेच २०२२ मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर स्नेहाने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबियांवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते.
-
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘संजना’ म्हणजेच अभिनेत्री रूपाली भोसलेने याच वर्षी प्रियकर अंकित मगरे याच्याशी ब्रेकअप केला आहे.
-
या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट करून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुपालीने अंकित बरोबर ब्रेकअप करण्याचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमात सूत्रसंचालन करणाऱ्या प्राजक्ता माळीचाही याचवर्षी ब्रेकअप झाला आहे. एक पत्रकार परिषदेत तिने याबाबत खुलासा केला होता.
-
तिने सांगितलं की एका चित्रपटाची शूटिंग सुरू असतानाच तिचा ब्रेकअप झाला. यामुळे ती नैराश्याचा सामना करत होती. तिने हेही सांगितले की हा काळ तिच्या आयुष्यातील अतिशय वाईट काळ होता. (Photos: Instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”