-
झोया अख्तरचा बहुचर्चित चित्रपट ‘द आर्चीज’चं शूटिंग नुकतंच संपलं. या शूटिंगच्या अखेरच्या दिवसाचे फोटो समोर आले आहेत.
-
या फोटोमध्ये सुहाना खान, खुशी कपूर, डॉट, मिहिर आहूजा, युवराज मेंडा, अगस्त्य नंदा आणि वेदांग रैना आनंद साजरा करताना दिसत आहेत.
-
झोया अख्तरचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट २०२३ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटाची कथा हायस्कुलमधील प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित आहे.
-
‘द आर्चीज’मध्ये सुहाना खान ‘वेरोनिका’, खुशी कपूर ‘बेट्टी’ तर अगस्त्य नंदा ‘आर्चीज’ या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
-
अगस्त्य नंदा, खुशी कपूर, सुहाना खान या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार आहेत.
-
झोया अख्तरने शूटिंग संपल्यानंतर रॅपचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम केक कापून सेलिब्रेट करताना आणि एन्जॉय करताना दिसत आहे.
-
झोया अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट आर्चीज या कॉमिक बुकवर आधारित आहे. जगभरात हे कार्टून कॉमिक लोकप्रिय होतं. (फोटो सौजन्य- झोया अख्तर इन्स्टाग्राम)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक