-
आमिर खानचा बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट यंदा प्रदर्शित झाला होता. हॉलिवूडच्या फॉरेस्ट गम्पचा हा रिमेक होता. १८० कोटींचे बजेट या चित्रपटाचे होते मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने ५९. ५८ कोटींची कमाई केली.
-
अक्षय कुमारने पहिल्यांदाच साकारलेली ऐतिहासिक भूमिका, बिग बजेट ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला, बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारक कामगिरी करू शकला नाही कारण चित्रपटाने तिकीट खिडकीवर केवळ ६८ कोटींची कमाई केली.
-
‘बच्चन पांडे’ हा अक्षय कुमारचा आणखी एक चित्रपट आहे ज्याने यावर्षी बॉक्स ऑफिसवर कमी कामगिरी केली आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक होता, मात्र प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवली.
-
‘हिरोपंती ‘चित्रपटाचा दुसरा भाग २९ एप्रिल २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया अभिनीत, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ २४.९१ कोटींची कमाई केली. अॅक्शन एंटरटेनर ७० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आले होते.
-
बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री कंगना रनौतचा ‘धाकड’ यावर्षी मे महिन्यात प्रदर्शित झाला होता, ८५ कोटींचे बजेट या चित्रपटाचे होते असे बोलले गेले होते. मात्र बॉक्स ऑफिसवर केवळ २.३ कोटींची कमाई चित्रपटाने केली.
-
रक्षाबंधन हा अक्षय कुमारचा आणखी एक चित्रपट होता जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. १०० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दुर्दैवाने, चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ ४५.२३ कोटींची कमाई करू शकला.
-
यशराज बॅनरचा आणि रणवीर सिंगने अभिनय केलेला जयेशभाई जोरदार या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. मात्र चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १६. ५९ कोटींची कमाई केली होती.
-
‘शमशेरा’ चित्रपटातून रणबीर कपूरने ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर झळकला होता. हा चित्रपटदेखील बिग बजेट होता मात्र बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही.
-
बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगणने यावर्षी रनवे हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात रकुल प्रीत सिंग आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेता मुख्य भूमिकेत होते. तगडी स्टारकास्ट असूनदेखील चित्रपट आपटला.फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा