-
अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही अशाच प्रकारचा लूक केला होता. त्यावेळी शिल्पाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते.
-
सोशल मीडियाच्या या युगात लोकप्रिय कलाकारांचे लूक नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अशावेळी जर कोणतेही कलाकार सारख्याच कपड्यांमध्ये दिसले तर त्यावरूनही वेगळी चर्चा सुरू होते.
-
याच कारणामुळे सध्या अभिनेत्री तमन्ना भाटियाला ट्रोल केलं जात आहे. तमन्नाने शिल्पा शेट्टीप्रमाणेच डबल टोन डेनिम जीन्स घातली होती. यानंतर तिने शिल्पाचा लूक कॉपी केला असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.
-
काही लोक म्हणत आहेत की तमन्नाने अगदी हुबेहूब तीच जीन्स घातली आहे जी काही दिवसांपूर्वी शिल्पाने घातली होती. तर काही लोकांचे असे म्हणणे आहे की हा एक निव्वळ योगायोग आहे.
-
तमन्ना भाटियाने काळ्या रंगाच्या टीशर्टसह डेनिम क्रॉप श्रग आणि डबल टोन डेनिम जीन्स घातली असून तिचा हा लूक शिल्पा शेट्टीच्या लूकने प्रभावित आहे.
-
सोशल मीडियावर तमन्ना हा लूक खूपच व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच शिल्पाने मनीष मल्होत्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला असा लूक परिधान केला होता.
-
त्यावेळी शिल्पाने काळ्या रंगाचा हॉल्टर नेक बॅकलेस टॉप आणि डबल टोन ब्ल्यू डेनिम जीन्स घातली होती. यानंतर तिला खूप ट्रोलही करण्यात आले होते.
-
तमन्नाच्या या लूकनंतर तिची आणि शिल्पाची इंटरनेटवर तुलना होत असून दोघींपैकी सर्वांत सुंदर कोण दिसत आहे यावरून चर्चा रंगली आहे.
-
तमन्नाला या लुकवरून ट्रोल करण्यात आलं असलं तरीही अनेकांनी ती शिल्पापेक्षा जास्त सुंदर दिसत असल्याचं म्हटलं आहे.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख