-
शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे.
-
या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्यामुळे या गाण्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
-
त्यामुळे सोशल मीडियावर boycottpathaan हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला आहे. अनेकजण ‘पठाण’ चित्रपट पाहणार नाही असं म्हणताना दिसत आहे.
-
‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणबरोबर जॉन अब्राहमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
या चित्रपटावरून मोठा वाद सुरु असतानाच हा चित्रपट का पाहावा याचं कारण शाहरुख खानने सांगितलं आहे.
-
शाहरुखने त्याच्या ट्विटरवर नुकताच त्याच्या चाहत्यांशी झंवाद साधला. त्यासाठी त्याने ‘आस्क एसआरके’ (AskSRK) हे प्रश्न-उत्तरांचं एक सेशन ठेवलं होतं.
-
या सेशनच्या माध्यमातून शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले.
-
शाहरुखनेही अनेक प्रशांना उत्तरं दिली.
-
ट्वीट करत एका चाहत्याने त्याला विचारलं, “तुझा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा?”
-
या प्रश्नचं उत्तर देताना शाहरुखने लिहिलं, “कदाचित तो चित्रपट बघताना तुम्हाला मजा येईल म्हणून.”
-
त्याच्या या उत्तरावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी शाहरुख खानची बाजू घेत बोललो तर कोणी त्याच्या विरोधात बोललं.
-
हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख