-
नव्वदच्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये आयशा जुल्का यांच्या नावाचाही समावेश आहे.
-
आयशा त्यांच्या कामाव्यतिरिक्त खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिल्या.
-
त्यांच्या लग्नाला आता १९ वर्ष पूर्ण झाली आहेत.
-
मात्र त्यांनी कधीच आई होण्याचा निर्णय घेतला नाही. यामागचं कारण नेमकं काय? याबाबत स्वतःच त्यांनी एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे.
-
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आयशा यांनी म्हटलं की, “कधीच लग्न करायचं नाही असा विचार मी केला होता. कारण मी एका घाणेरड्या रिलेशनशिपमध्ये होते.”
-
“कधीच लग्न न करण्याचा निर्णय मी माझ्या कुटुंबियांनाही सांगितला होता. त्यांनीही माझ्या या निर्णयाचा स्वीकार केला.”
-
“पण एक दिवस माझी आई व बहीण यांची मेडिटेशन क्लासमध्ये समीरशी भेट झाली. समीर माझ्यासाठी चांगला आहे असं त्यांना वाटलं. त्यानंतर समीर व मी एकत्र आलो. आम्ही दोघांनी लग्न केलं.”
-
“मी माझ्या आयुष्यामध्ये बरेच चढ-उतार पाहिले आहेत. मला मुल नको असल्याचं जेव्हा मी माझ्या पतीला सांगितलं तेव्हा त्यानेही माझ्या या निर्णयाला पाठिंबा दिला.”
-
“समीरबरोबर लग्न केल्यानंतर आम्ही गुजरातमधील दोन गावं दत्तक घेतली. आम्ही तिथल्या १६० मुलांचा सांभाळ करतो. तसेच त्यांच्या शाळेची जबाबदारीही आमच्यावर आहे.”
-
“त्या १६० मुलांना मी मुंबईमध्ये घेऊन येऊ शकत नाही. म्हणून मी तिथल्या गावी जाऊन त्यांच्याबरोबर एकत्र वेळ एण्जॉय करते.”
-
सर्व फोटो – (फेसबुक)
आता दु:खाचे दिवस संपणार! चैत्र पौर्णिमेच्या आधी ‘या’ राशींच्या दारी पैसा येईल चालून? रखडलेली कामे होऊ शकतात पूर्ण