-
२०२३मध्ये सुश्मिता सेन ‘ताली’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे.
-
भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित ‘छकडा एक्सप्रेस’मध्ये अनुष्का शर्मा मुख्य भूमिका साकारणार आहे.
-
फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या जीवनावर आधारित ‘सॅम बहाद्दूर’मध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
-
ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांच्या जीवनावर आधारित ‘पिप्पा’मध्ये इशान खट्टर मुख्य भूमिका साकारणार आहे.
-
‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्व्हे’ चित्रपटात राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.
-
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा मुख्य भूमिका साकारणार आहे.
-
परमवीर चक्र विजेते अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित ‘इक्किस’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा मुख्य भूमिका साकारणार आहे.
-
‘इमर्जन्सी’ चित्रपटात कंगना रणौत दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे, पण यामध्ये कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत दिसेल, याबाबत निर्मात्यांनी माहिती दिलेली नाही.
-
इंजिनिअर सरदार जसवंत गिल यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारणार आहे.
-
दिवगंत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘अटल’ चित्रपटात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसतील.
-
कोरेगाव भीमावर आधारित ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सिद्धांक इनामदार यांच्या भूमिकेत अभिनेता अर्जुन रामपाल दिसणार आहे. (सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”