-
अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने १४ डिसेंबरला बॉयफ्रेंड शानवाज शेखशी लग्नगाठ बांधली.
-
देवोलीनाने आंतरधर्मिय लग्न के्याने तिला ट्रोल केलं गेलं. तसेच तिच्या लग्नाची तुलना श्रद्धा वालकर प्रकरणाशी केली गेली.
-
पण, देवोलीना ही आंतरधर्मीय विवाह करणारी पहिली अभिनेत्री नाही. यापूर्वी छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय अभिनेत्रीने मुस्लीम दिग्दर्शकाशी लग्न केलं होतं. तेही तब्बल चार वेळा.
-
ती अभिनेत्री आहे शरारत फेम श्रृती सेठ. श्रृतीने १२ वर्षांपूर्वी दिग्दर्शक दानिश अस्लमशी लग्न केलं होतं. दोघांची लव्ह स्टोरीदेखील खास होती.
-
कॉमेडी शो ‘शरारत’ फेम श्रुतीने ‘फना’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
त्याच चित्रपटाच्या सेटवर तिची भेट दानिशशी झाली, जो चित्रपटाचा दिग्दर्शक कुणाल कोहलीचा सहाय्यक होता.
-
दोघांची पहिली भेटही खूप मजेदार होती. सेटवर युनिटशी बोलत दानिश ओरडून ओरडून बोलत होता.
-
तेव्हा जवळच उभ्या असलेल्या श्रुतीने दानिशच्या मागच्या खिशात ठेवलेला माईक काढला आणि दानिशला माझ्याकडेही माईक आहे, असं सांगितलं.
-
तेव्हापासून दोघेही एकमेकांशी बोलू लागले. दानिशने एका मुलाखतीत सांगितले होते की, या दिवसापासून ते दोघे एकमेकांना नऊ दिवस दिवसाला ५० मेसेज करत होते.
-
त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.
-
यानंतर त्यांनी एकमेकांना पाच वर्षे डेट केले आणि त्यानंतर लग्नाची वेळ आली.
-
दोघांनी लग्नासाठी खूप खास दिवस निवडला जेणेकरून त्यांचे लग्न अविस्मरणीय राहील. दोघांनी १० ऑक्टोबर २०१० (१०. १०.१०) रोजी लग्न केले.
-
दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने लग्नात अडचण आली. दानिशने सांगितले होते की, दोघांचे आई-वडील तयार नव्हते, पण कसेतरी त्यांनी पालकांना मनवले.
-
सर्वप्रथम दोघांनी गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते.
-
त्यानंतर आई-वडिलांना खूश करण्यासाठी दोघांनी हिंदू, नंतर मुस्लिम पद्धतीने लग्न केलं.तसेच त्यांनी कोर्ट मॅरेजही केलं.
-
दानिश आणि श्रुतीच्या लग्नाचं सेलिब्रेशन तीन दिवस चाललं आणि या तीन दिवसात दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने चार वेळा लग्न केले. (सर्व फोटो – सोशल मीडिया)
-
दानिश आणि श्रृतीला एक मुलगी आहे.
-
श्रृती आणि दानिश सोशल मीडियावर सक्रिय आहेत.
-
दोघेही एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.
-
दोघांच्याही लग्नाला १२ वर्षे झाली असून ते आनंदाने जीवन जगत आहेत.
-
(सर्व फोटो – श्रृती सेठच्या इन्स्टाग्रामवरून साभार)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख