-
‘बिग बॉस’ या बहुचर्चित शोचे लाखो चाहते आहेत.
-
प्रेक्षक हा शो आवडीने पाहतात.
-
‘बिग बॉस’च्या घरात येणारा आवाज नेमका कोणाचा? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
-
तर विजय विक्रम सिंह गेली कित्येक वर्ष ‘बिग बॉस’चा आवाज आहेत.
-
आज विजय सिंह यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण यापूर्वी त्यांचं आयुष्य मात्र काही वेगळंच होतं.
-
‘आजतक’च्या वृत्तानुसार, विजय नशेच्या आहारी गेले होते. त्यामुळे त्यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता.
-
आर्मी ऑफिसर व्हायचं हे विजय यांचं स्वप्न होतं. मात्र ते स्वप्न पूर्ण न झाल्याने त्यांना वयाच्या १८व्या वर्षीचं दारूचं व्यसन लागलं. २४व्या वर्षापर्यंत सकाळी उठून दारूचं सेवन करायचं हा त्यांचा ठरलेला नियम होता.
-
पण नशेच्या आहारी गेलेल्या विजय यांना परिणामी गंभीर आजाराचा सामना करावा लागला. त्यांना पोटाचा आजार झाला. त्यांची जगण्याची आशा खूप कमी आहे असं डॉक्टरांनीही सांगितलं होतं.
-
दरम्यान त्यांना निमोनियाचाही सामना करावा लागला. लखनऊ येथील रुग्णालयामध्ये जवळपास ३० ते ३५ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. नशिबाने त्यांना साथ दिली.
-
डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर ते या आजारामधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी नशा करणंही सोडलं. विजय यांनी मुंबईमध्ये येऊन वॉइस आर्टिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सरकरी नोकरी सोडून त्यांनी कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
-
आज विजय अनेक चित्रपटांचं डबिंग करतात. शिवाय २०१८मध्ये त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. (सर्व फोटो – फेसबुक)
Mangal Gochar 2025: शनीच्या नक्षत्रामध्ये मंगळच्या प्रवेशाने ५ राशींचे नशीब पलटणार, पैशांचा पाऊस आणि करिअरमध्ये येणार मोठा बदल