-
सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं १७ जानेवारी २०२२ रोजी निधन झालं. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना १९८३ मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
-
२ फेब्रुवारी २०२२ रोजी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. कित्येक दशकं त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
-
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईच्या शिवाजी पार्कवर करोडो चाहत्यांनी गर्दी केली होती. संगीतविश्वातील कधीही न भरून निघणारी पोकळी लतादीदी यांच्या जाण्यामुळे निर्माण झाली.
-
प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांनी १० मे २०२२ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहिरी यांचे १५ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटके संगीताने बप्पी लहिरी यांनी विशेष ओळख निर्माण केली.
-
९ ऑगस्ट २०२२ रोजी मराठी मनोरंजनसृष्टीला अनपेक्षित धक्का बसला जेव्हा प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं. चित्रपट आणि नाट्यसृष्टीत प्रदीप पटवर्धन यांच्या नावाला एक वजन होतं. ६५ व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
प्रसिद्ध गायक केके यांचे ३१ मे २०२२ रोजी निधन झाले. त्यांना Voice of Love देखील म्हटलं जायचं. कोलकातामध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं, तिथेच त्यांना मृत म्हणून डॉक्टरांनी घोषित केलं. संपूर्ण मनोरंजनसृष्टीसाठी हा खूप मोठा धक्का होता. वयाच्या ५३ व्या वर्षी केके यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे २६ नोव्हेंबर २०२२ रोजी निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचं १० डिसेंबर २०२२ रोजी निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”