-
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे. गेले अनेक दिवस या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे.
-
नुकतीच ‘सर्कस’ टीममधील कलाकारांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमध्येही हजेरी लावली होती.
-
हास्यजत्रेतील कलाकारांबरोबर ‘सर्कस’ चित्रपटातील कलाकारांनीही प्रेक्षकांना खळखळवून हसवलं.
-
रोहितच्या अनेक चित्रपटांत मराठी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळतात.
-
रोहित शेट्टीच्या या चित्रपटातही मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर व अश्विनी काळसेकर हे मराठी कलाकारही झळकले आहेत.
-
मराठी कलाकारांना चित्रपटात कास्ट करण्यामागचं खरं कारण रोहितने हास्यजत्रेत सांगितलं.
-
चित्रपटात तू मराठी कलाकारांना का घेतोस, असा प्रश्न मला अनेक जण विचारत असल्याचं रोहित शेट्टीने सांगितलं.
-
तो म्हणाला, “मराठी कलाकार हे साधे व प्रतिभावान असतात. त्यांना अहंकार नसतो”.
-
“उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे करणारे अनेक कलाकार आहेत. पण मराठी कलाकार कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेत काम करतात”, असं म्हणत रोहित शेट्टीने मराठी कलाकारांचं कौतुक केलं.
-
“याबरोबरच मला चित्रपटातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ६० टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे”, असंही पुढे रोहित म्हणाला.
-
रोहित शेट्टी व रणवीर सिंगसह सर्कस चित्रपटातील जॅकलिन फर्नांडिस, विजय चव्हाण, वरुण शर्मा, अश्विनी काळसेकर, सिद्धार्थ जाधव या कलाकारांनीही प्रमोशनसाठी हास्यजत्रेत हजेरी लावली होती. (सर्व फोटो: इंडियन एक्सप्रेस)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख