-
जवळपास ४ दशकं इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या अनिल कपूर यांनी अनेक सुपरहिट चित्रपटत दिलेत.
-
त्यांचे सिनेसृष्टीत अनेक मित्र आहेत. पण अनिल कपूर यांचे काही जणांशी वादही झाले. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री तब्बूची बहीण फराह नाज.
-
अनिल कपूर ८०-९० च्या दशकात खूप मोठे स्टार होते. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक मोठे दिग्दर्शक उत्सुक असायचे.
-
अनिल कपूर यांनी इंडस्ट्रीतील जवळपास प्रत्येक मोठ्या निर्मात्यांबरोबर आणि कलाकारांबरोबर काम केलं. फराह नाजने अनिल कपूरसोबत ‘रखवाला’ आणि ‘काला बाजार’मध्ये काम केले होते.
-
‘रखवाला’ चित्रपटादरम्यान फराह अनिल कपूरवर चांगलीच चिडली होती आणि तिने मीडियासमोर त्याला धडा शिकवण्याची धमकीही दिली होती.
-
अनिल कपूर यांना ‘रखवाला’ चित्रपटातून फराहला काढून माधुरी दीक्षितला घ्यायचे होते. यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते.
-
फराहला जेव्हा हे समजल्यावर ती अनिल कपूरवर चांगलीच चिडली. अनिल कपूरना धमकी देत ती माधुरीबद्दलही बरंच बोलली होती. अखेर फराहने तो चित्रपट केलाच, पण त्यानंतर तिने अनिल कपूरसोबत काम केलं नाही.
-
फराह नाज ही अभिनेत्री तब्बूची बहीण आहे.
-
अनिल कपूर आणि फराहचं भांडणं झालं असलं तरी, अनिल व तब्बू चांगले मित्र आहेत. (सर्व फोटो – सोशल मीडियावरून साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”