-
मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले आहे. अमृता खानविलकर ही कायमच तिच्या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात असते.
-
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही अमृताने नावलौकिक मिळवला आहे. अमृताने नुकतंच एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.
-
मात्र त्यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले.
-
आता तिने याच ड्रेसवरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
अमृताने यावेळी लाल रंगाचा शर्ट पँट प्रकारातील एक वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता.
-
त्याबरोबर तिने गळ्यात साधी चैन आणि न्यूड मेकअपही केला होता. विशेष म्हणजे याला साजेशी हेअरस्टाईलही तिने केली होती.
-
तिने हा ड्रेस फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सोहळ्यादरम्यान परिधान केला होता. यात अमृता ही अतिशय ग्लॅमरस दिसत होती.
-
अमृताने परिधान केलेला हा ड्रेस थोडा बोल्ड होता. यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली.
-
“असे कपडे घालून तुम्हाला काय दाखायचे असते नेमकं? अस तर नाही ना की आम्ही खूप मॉर्डन आहेत हे दाखण्यासाठी असे कपडे घालावे लागतात. असा मॉडर्न पणा काय कामाचा जो अंगावरचे कपडे काढून टाकायला भाग पाडतो”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
-
“ताई तुम्ही चांगले मराठी कलावंत आहात आणि असे कपडे परिधान करणे तुम्हाला शोभत नाही”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
-
तर एकाने “काय बाई मराठी संस्कृत जपा की जरा गरीबसुद्धा अंग झाकायला मागे पुढे करत नाही आणि अतोनात पैसा आल्यावर एवढा भिकारडेपणा…”, अशी संतप्त कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
-
तर एक जण म्हणाला “अमृता खानविलकर तुला असे सर्व करायची काय गरज?” “ही पण झाली आता गरिबांची सई ताम्हणकर”, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे.
-
दरम्यान काही महिन्यांपूर्वी अमृता खानविलकरचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. त्यानंतर ती ‘झलक दिखला जा’या कार्यक्रमात सहभागी झाली

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल