-
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे.
-
तिने मालिकेच्या सेटवर गळफास लावून जीवन संपवलं. तुनिषा २० वर्षांची होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलंय.
-
तिने तिच्या करिअरची सुरुवात इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून केली होती.
-
तुनिषा सोनी सब टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’मध्ये मुख्य भूमिका साकारत होती.
-
तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर सेटवरील लोकांनी तिला रुग्णालयात नेलं होतं, पण रस्त्यातच तिचं निधन झालं.
-
तुनिषा शर्मा ‘अली बाबा दास्तान ए काबुल’चे शूटिंग करत होती.
-
चहाच्या ब्रेकदरम्यान तुनिषा टॉयलेटमध्ये गेली आणि बराच वेळ बाहेर आली नाही, त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला.
-
यावेळी तुनिषाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं.
-
दरम्यान, तुनिषाच्या मृत्यूबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
-
अशातच तुनिषाचा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेतील सह-कलाकार आणि कथित बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खान याच्यावर अभिनेत्रीच्या नातेवाईकांनी आरोप केले आहेत.
-
तुनिषा मालिकेतील तिचा सहकलाकार शिझान खानला डेट करत होती.
-
तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तिने शिझानला लव्ह म्हटलंय. दोघांचे अनेक फोटो तिने शेअर केले होते.
-
अशातच आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
-
तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझानला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
-
शिझानच्याच रुममध्ये अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
-
टेलिचक्करने दिलेल्या वृत्तानुसार, तुनिषाने शिझानच्या रुममध्ये गळफास घेतला.
-
शिझान तुनिषाशी मागच्या काही दिवसांपासून बोलत नव्हता, त्यामुळे ती नैराश्यात होती.
-
तिच्या नातेवाईकांनीही शिझानला समजावलं होतं.
-
टेली चक्करने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई पोलिसांनी तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी शिझानला ताब्यात घेतलंय.
-
शिझानची या प्रकरणी चौकशी केली जात आहे.
-
(सर्व फोटो इन्स्टाग्रामवरून साभार)

अमरावती ते मुंबई विमान प्रवासाचे वेळापत्रक, तिकीट दर जाहीर; फक्त…