-
सोनी सब टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ची मुख्य अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे.
-
मालिकेच्या सेटवरच गळफास लावून तिने जीवन संपवलं.
-
२० वर्षीय तुनिषाने बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती.
-
तुनिषा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३ ‘ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती.
-
तुनिषाने आत्महत्या करण्याच्या सहा तासांपूर्वीच सेटवरचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला होता.
-
या व्हिडीओमध्ये ती सेटवर शूटसाठी मेकअप करताना दिसत होती.
-
काही तासांपूर्वी तिने स्वत:चा एक फोटोही इन्स्टाग्राम शेअर केला होता. “कामाची आवड असलेल्या व्यक्ती कधीच थांबत नाहीत”, असं कॅप्शन दिलं होतं.
-
त्यामुळे ती असं काही करेल, असं कोणाच्या ध्यानीमनीही नव्हतं. पोस्ट शेअर केल्यानंतर काही तासांतच आत्महत्या केल्याने तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
-
तुनिषाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण सेटवर नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया.
-
वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “फिल्मसिटीमधील रामदेव स्टुडिओमध्ये मालिकेचं शूटिंग सुरू होतं. शूटिंगदरम्यान थोडा वेळ ब्रेक देण्यात आला होता”.
-
“ब्रेकदरम्यान तुनिषा बाथरुममध्ये गेली आणि तेथील फॅनला गळफास घेत तिने आत्महत्या केली”.
-
“त्यानंतर सेटवरील लोकांनी तिला रुग्णालयात नेलं. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे”, असं ते म्हणाले.
-
“तुनिषाने नेमकी आत्महत्या का केली? तसेच तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती का? त्याचा आम्ही तपास करत आहोत”, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
-
(सर्व फोटो: तुनिषा शर्मा/ इन्स्टाग्राम)

११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य