-
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे.
-
सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती.
-
तिच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीसह सर्वत्र खळबळ उडाली आहे.
-
तुनिषाने मालिकेच्या सेटवरच गळफास घेऊन जीवन संपवल्याने सर्वांनाचा धक्का बसला आहे.
-
तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
-
तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिचा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेतील सह-कलाकार आणि कथित बॉयफ्रेंड शिझान खान याच्यावर अभिनेत्रीच्या नातेवाईकांनी आरोप केले आहेत.
-
यानंतर पोलिसांनी शिझानच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली.
-
या संपूर्ण प्रकरणानंतर शिझान खान कोण आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नुकतंच त्याच्याबद्लची माहिती समोर आली आहे.
-
शिझान खानचा जन्म ९ सप्टेंबर १९९४ मध्ये मुंबईत झाला.
-
त्याने मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे.
-
शिझानने फार कमी वयात सिनेसृष्टीत पदार्पण केले.
-
जोधा अकबर या मालिकेत त्याने भूमिका साकारली आहे.
-
या मालिकेत त्याने अकबरच्या बालपणीचे पात्र साकारले होते.
-
शिझान ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत तुनिषाचा सहकलाकार आहे.
-
या मालिकेत तो अलिबाबा या मुख्य भूमिकेत होता.
-
शिझान व तुनिषाची मैत्री फार चांगली होती. त्यांचे ऑनस्क्रीनसह ऑफस्क्रीन संबंधही चांगले होते.
-
तुनिषाने तिच्या इन्स्टाग्रामवर शिझानबरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
तुनिषा व शिझान एकमेकांना डेट करत असल्याच्याही चर्चा होत्या.
-
प्रसिद्ध अभिनेत्री फलक नाझचा तो छोटा भाऊ आहे.
-
तुनिषाने शिझान खानच्याच मेकअप रुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
