-
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी (२४ डिसेंबर) दुपारी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली.
-
सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती.
-
तुनिषा शर्माने बालकलाकार म्हणून महाराणा प्रताप मालिकेतून पदार्पण केले होते. मात्र ती अशोक सम्राट मालिकेतील अहंकाराच्या भूमिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आली.
-
विशेष म्हणजे तिने बॉलिवूडमध्येदेखील काम केले आहे. तिने ‘फितूर’ या चित्रपटात कतरीना कैफच्या तरुणपणीची भूमिका साकारली होती.
-
-
तिच्या अनेक चाहत्यांना हे माहित असेल की तिचे कुटुंबीय तिला टुन्नो म्हणत असे. कारण हे तिच्या कुटुंबातील सदस्यांनी दिलेले टोपणनाव आहे.
-
नृत्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसले तरी ती उत्तम नृत्यांगना होती.
-
भारतीय संघातील स्टार खेळाडू विराट कोहलीची ती चाहती होती.
-
अभिनेत्रीने आत्महत्या केली तेव्हा तिचे वय अवघे २० वर्ष इतके होते, त्यामुळे तिच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे.
-
तुनिषाने एका मुलाखतीत सांगितले होते की नैराश्यामुळे तिला काम करण्याची इच्छा वाटत नव्हती.
-
ती पुढे म्हणाली होती, मी लहान असल्यापासून काम करत आहे. मी लहान वयात वडील गमावले आहेत. मग मी माझी चुलत बहीण गमावली आणि माझ्या आजीचेही निधन झाले. स्वत:ची काळजी घेण्यासाठी मी भावनिकरित्या तुटले होते. काम न होण्याची भीती कायम होती.
-
तिचा मित्र कंवर ढिल्लनने तिला नैराश्यातुन बाहेर काढण्यासाठी मदत केली होती. तुनिषा शर्माचा जन्म चंडीगढचा, तिने वयाच्या १४ व्या वर्षी अभिनय करण्यास सुरुवात केली होती.फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच